शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक संचालक अनिल पाटील व जि.प. सदस्या जयश्री पाटलांंविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 20:58 IST

तहसीलदारांची तक्रार, सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप

अमळनेर- येथील तहसीलदार व जिल्हा परिषद सदस्या यांच्यातील १९ जून रोजी झालेल्या वादाचे पडसाद गुन्हे दाखल व तक्रारीत झाले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील व त्यांचे पती जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ रोजी त्यांच्या कार्यालयात पंतप्रधान किसान सन्मान योजना विस्तारित स्वरूपात लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिका-यांची बैठक घेत असताना जि.प. सदस्या जयश्री पाटील यांनी जोराने दार लोटून आक्रमकपणे बैठकीमध्ये प्रवेश केला. काही वेळापूर्वी जयश्री पाटील यांनी देवरे यांना फोन केला होता, पण बैठकीत असल्याने देवरे फोन घेऊ शकल्या नाहीत. या रागातून त्यांनी अपशब्दांचा वापर करून सर्वांसमक्ष तहसीलदार पदाचा अपमान केला. तसेच महत्त्वपूर्ण शासकीय बैठकीमध्ये अडथळा निर्माण केला. जयश्री यांचे पती अनिल भाईदास पाटील यांनी फोन करून १०० महिला बोलावून तुमच्या तोंडाला काळे फसणार, अशी धमकी देवरे यांना दिली होती. सदर फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ५०१, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सदगीर करीत आहेत.दरम्यान, तहसिलदारांनी शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेल्या जयश्री पाटील यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी प्रांत अधिकारी सीमा अहिरे व जळगाव जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. दुष्काळ निवारणाच्या निधीचे दस्तऐवज तहसीलदार यांच्या टचेबलवर अनेक दिवसांपासून असल्यामुळे त्यचासंबंधी विचारणा करण्यासाठी जयश्री पाटील गेल्या होत्या. त्यांचा फोनही देवरे यांंनी उचलला नाही. शेतक-यांच्या दुष्काळ निधीबाबत विचारले असता, देवरे यांनी तू विनापरवानगी आत कशी आलीस, असे खड्या आवाजात म्हटले. त्यानंतर त्य मला उद्धटपणे बोलत राहिल्या. एवढेच नाही, तर माझी व्हिडिओ शुटींग काढणे त्यांनी सुरु केले. मला अपमानास्पद वागणूक देऊन शासकीय कामात अढथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्याची धमकी दिली, असे जयश्री पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. दबंग अधिका-यावर १५ दिवसांच्या आत शासकीय कारवाई न केल्यास आपल्या कार्यालयाच्या आवारात आम्ही कायदेशीर मागार्ने उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत, असे पत्र प्रांताधिकारी यांना दिले आहे.यावेळी जयश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरीया, मुक्तार खाटीक, प्रवीण पाटील, अलका पवार, दीपक पाटील, गौरव पाटील, बाळू पाटील, भटू पाटील, राहुल गोत्राळ, प्रदीप पाटील, दौलत पाटील, संभाजी पाटील, देविदास देसले, सचिन पाटील, तेजस वानखेडे, दिनेश कोठावदे, नंदकिशोर पाटील, अभी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.