शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक नोकर भरती प्रक्रिया महिनाभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:22 IST

वार्षिक सर्वसाधारण सभा : एकनाथराव खडसे यांची घोषणा

ठळक मुद्देनोकर भरतीला शासनाकडून मंजुरीशुक्रवारी झाली बँकेची १०१ वी सभाबँकेची स्थिती सुधारत असल्याचे सांगितले़

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्हा बँकेतील नोकर भरतीला शासनाकडून मंजुरी मिळाली असून ही प्रक्रिया महिनाभरात राबविली जाईल, अशी घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.जिल्हा बँकेच्या आवारात शुक्रवारी बँकेची १०१ वी सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, सरकारची परवानगी नसल्यामुळे आतापर्यंत कर्मचारी भरती करता आली नाही, परंतु नुकतीच परवानगी मिळाली असून आॅनलाईन भरती होणार आहे. राज्यातील कोणीही व्यक्ती अर्ज करु शकतो. मात्र केवळ जिल्ह्यातील तरुणांनाच संधी मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती परंतु ती सरकारने ती मान्य केली नसल्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला़२ वर्षात बॅँक पूर्णत: एनपीए तून बाहेर येईलयावेळी खडसे म्हणाले की कोणतेही काम करताना त्रुटी असू शकते परंतु ती दूर करण्याची भूमिका असली पाहिजे. तीन वर्षांपूर्वी बँकेला ‘ड’ वर्ग मिळाला होता, आता प्रथमच बँक ‘अ’ वर्गात आली आहे. सर्व संचालक कोणताही भत्ता न घेता बँकेच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहेत, ही आनंदाची बाब आहे. पूर्वी ठेवी कमी होत होत्या. आता तीन वर्षात ८५० कोटींच्या ठेवींची नव्याने वाढ झाली आहे. हा बँकेने विश्वास कमवला आहे. नोटा बंदीच्या काळात बँकेचे व्यवहार ठप्प होऊन बँकेस थोडा तोटा सहन करावा लागला. असे असतानाही बँकेचा ढोबळ नफा २३ कोटी इतका आहे.बँकेची स्थिती सुधारत असून २ वर्षात बॅँक पूर्णत: एनपीए तून बाहेर येईल, असेही त्यांनी आश्वासित केले. तर दूध संघानेही २५ कोटी रुपये नफा कमवला असून राज्यात प्रथम क्रमांकवर संघ आहे. मी कधीही चुकीचे काम करणार नाही, असेही त्यांंनी सांगितले.

दिवाळीचा बोनस २० दिवसांचाबँकेच्या कर्मचाºयांना दरवेळेस १५ दिवसांचा दिवाळी बोनस देण्यात येतो. यंदा मात्र हा बोनस २० दिवसांचा देण्यात येईल, अशी घोषणा एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणातून केली. या घोषणेचे कर्मचाºयांनी स्वागत केले.