|
जळगाव : जिल्हा बँकेचे चेअरमन चिमणराव पाटील व कार्यकारी समितीच्या संचालकांनी पैसे मोजण्याच्या मशीन खरेदीत ७ लाख ६ हजार ७८0 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल तक्रारीत आर्थिक गुन्हा शाखेच्या पथकाने बँकेतील अधिकार्यांचे जबाब नोंदविले आहे. या संदर्भात लेखा परिक्षकांच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे. पारोळा येथील रहिवासी व बॅंकेचे सभासद बाळासाहेब भास्करराव पाटील यांनी याबाबत तक्रार दिली होती. या तक्रार अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक सोनवणे यांनी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, व्यवस्थापक प्रकाश पाटील, मधुकर चौधरी व नवृत्त व्यवस्थापक यशवंत देसले यांचे जबाब नोंदविले आहे. पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने काही कागदपत्रे बँकेकडून मागविली होती. त्यानुसार बँकेने नोटा मशिन खरेदीबाबतची निविदा, ठरावाची प्रत, वर्क ऑर्डर, बिलाची झेरॉक्स व डिलीव्हरी चलनाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणात पोलिसांना आता लेखा परीक्षकांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सोनवणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. |
जिल्हा बँकेच्या अधिकार्यांचे जबाब
By admin | Updated: January 29, 2015 15:01 IST