शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

भेसळयुक्त माव्याची जिल्ह्यात धडक

By admin | Updated: November 6, 2015 00:11 IST

दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर मिठाई तयार केली जात असून त्यासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंचा दर्जा सुमार राहत असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार : अन्न व औषध प्रशासन विभागाचा ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचा’

प्रकार सुरूच आहे. दिवाळीत अन्न पदार्थाची गुणवत्ता, भेसळ याबाबत पुन्हा आलबेल चित्र भासवले जात आहे. सणासुदीच्या काळात किमान 15 दिवस आधी या विभागाने मिठाई व इतर पदार्थ विक्रेत्यांचे प्रबोधन करून त्यांना भेसळीसंदर्भात कडक कारवाईचा इशारा देणे आवश्यक असताना तसे काहीही दिसून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर मिठाई तयार केली जात असून त्यासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंचा दर्जा सुमार राहत असल्याचे चित्र आहे.

 

नंदुरबारात आधीच दुधाची टंचाई आहे. असे असताना शहरात असलेल्या 25 पेक्षा अधिक मोठय़ा हॉटेल्सचालकांना मावा बाहेरूनच आयात करावा लागतो. त्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद, सुरत या शहरांना सर्वाधिक पसंती आहे. तयार माव्याची ऑर्डर दिल्यास तो ऑर्डरच्या ठिकाणी पोहोच करण्याची व्यवस्था विक्रेत्यांकडे आहे. आयात केलेल्या माव्यावर प्रक्रिया करून त्याची मिठाई तयार केली जाते.

या माव्यात भेसळ किती हा भाग अलहिदा असतो. भेसळीचे प्रमाण जास्त राहिल्यास त्यातून विषबाधेसारखे प्रकारही घडून येतात. चार वर्षापूर्वी रबडीतून विषबाधा झाली होती. दोन वर्षापूर्वी दिवाळीच्या काळात शेकडो किलो भेसळयुक्त मावा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने अशा प्रकारची कारवाई कधीही केलेली ऐकीवात नाही.

दिवाळीला मिठाईला मागणी वाढते. त्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणाहून मावा मागवत असतात. ही बाब लक्षात घेता त्यात त्याची गुणवत्ता पाहिली जात नाही. परिणामी बोगस व भेसळयुक्त माव्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात असल्याचा आरोपही करण्यात येतो.

हॉटेलमधील अस्वच्छता

चार वर्षापूर्वी रबडी विषबाधेनंतर हॉटेल्समधील स्वच्छता, उघडय़ावरील खाद्यपदार्थाची विक्री, खाद्यपदार्थाची गुणवत्ता, भेसळ आदी प्रश्न चर्चेत आले होते. जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने नेहमीप्रमाणे सोपस्कार केले. हॉटेल्स व्यावसायिकांनी एक दिवस सामूहिक स्वच्छता करून उरकवून घेतले. हॉटेल्समधील पदार्थ तयार करणा:या जागेवरील स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर तरी काळजी घेण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.

विभागाचे दुर्लक्ष

अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हा धुळे येथून चालतो. नंदुरबारला स्वतंत्र कार्यालय सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार हा उंटावरून शेळ्या हाकलण्याच्या प्रकारासारखाच झाला आहे. त्यामुळे भेसळखोरांचे मोठय़ा प्रमाणावर फावले आहे.

वास्तविक दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असते. ते पाहता भेसळ होणार नाही, पदार्थाची गुणवत्ता टिकून राहील यासाठी या विभागाच्या अधिका:यांनी मोठय़ा मिठाई विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांचे प्रबोधन करून, त्यांच्या हॉटेल्सला भेट देऊन मार्गदर्शन करणे आवश्यक होते. प्रसंगी भेसळ आढळल्यास कडक कारवाईचा इशारादेखील देता आला असता. परंतु त्यातील कुठलाच प्रकार या विभागाच्या अधिका:यांनी केला नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे फावले आहे.