जामनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब आणि गरजू लोकांना रोजगार नसल्याने त्यांना मदत म्हणून गेंदाबाई मोहनलाल लोढा प्रतिष्ठानकडून गुरुवारी शहरातील ३०९ गरजूंना रेशन किट वितरित करण्यात आल्या.
कोरोना संकटकाळात प्रतिष्ठान सेवाधर्म जोपासत आहे, असे प्रजापिता ब्रह्मकुमारी सुषमादीदी यांनी सांगितले. प्रजापिता ब्रह्माकुमारी सुषमादीदी, यशवंतराव देशमुख व डी. एल. पाटील यांच्या हस्ते रेशन किट देण्यात आल्या.
यावेळी विनोद लोढा, वंदना लोढा, जितेंद्र पालवे, दीपक देशमुख यांनी स्वागत केले. देशमुख यांनी संस्थेला ५ हजार १०० ची देणगी दिली. गोपाल देशपांडे, वसीम शेख, शरीफ खान, ॲड. विकास चौधरी यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : जामनेरला गरजूंना रेशन किट देताना यशवंत देशमुख, सोबत विनोद लोढा आदी.