जळगाव : तालुक्यातील दापोरा येथे कृषी विभाग व शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे याचे उपस्थितीत मका बियाणे शेतकऱ्यांना प्रत्येकी बॅग देण्यात आली. यासह मका लागवड कशी करावी, बीजप्रक्रिया, खताचा उपयोग, उत्पन्न कशा प्रकारे वाढेल याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, एन. व्हाल्हे, कृषी सहायक विनोद राजपूत, सरपंच कविता वाणी, उपसरपंच गोविंदा तांदळे, सदस्य चंद्रकांत काळे, बळिराजा शेतकरी गटाचे अध्यक्ष विजय सोनवणे, समाधान निकुंभ यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
जिल्ह्यात २० नंतरच मान्सून होणार सक्रिय
जळगाव : राज्यात मान्सून पूर्णपणे व्यापला असला तरी जळगाव जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात ९० हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कापसाची लागवड झाली आहे. मात्र, पावसाने हजेरी न लावल्यामुळे कापसाचे पीक धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात २० जूननंतरच मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.