कजगाव, ता. भडगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कुपोषित बालकांना आहार वाटप कार्यक्रम दि. १३ रोजी भडगावच्या सभापती डॉ. अर्चना पाटील, डॉ. विशाल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी सुचिता आकडे, डॉ. प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत कजगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला.
येथील माताजी हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. विशाल पाटील व सभापती डॉ. अर्चना पाटील यांनी कजगाव व वाडे परिसरातील १३ कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना आहाराचे वाटप केले. यावेळी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मिटकरी, आरोग्यसेवक संजय सोनार कळवाडीकर, किरण पाठक, आरोग्यसेविका उज्वला परदेशी, नलू परदेशी, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुजाता चौधरी, हिरकणा संदानशिव उपस्थित होत्या.
140721\14jal_1_14072021_12.jpg
आहार वाटप करताना सभापती डॉ. अर्चना पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील व आरोग्य कर्मचारी.