तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे प्रति लाभार्थी रक्कम रुपये वीस हजारांचे धनादेश असे एकूण ५ लाभार्थ्यांना रक्कम रुपये एक लाख एवढी रक्कम वाटप करण्यात आली.
तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या एकूण २६८ प्रकरणांवर निर्णय घेण्यात येऊन ती मंजूर करण्यात आली आहेत. आमदार सोनवणे यांनी कार्यालयाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी समिती सदस्य संतोष अहिरे, शिवसेना तालुकाप्रमुख मंगलाताई पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, गोपाल चौधरी, महिला जिल्हाप्रमुख रोहिणीताई पाटील, संजीव शिरसाठ, शहरप्रमुख आबा देशमुख, आत्माराम गंभीर, माणिकचंद महाजन, तहसीलदार अनिल गावीत, प्र. संगायो नायब तहसीलदार राजेश पऊळ, इंगांयो अव्वल कारकून योगिता एच. न्हाळदे तसेच लिपीक जे. ए. पवार व आयटी असिस्टंट समाधान कोळी हे उपस्थित होते.