शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

१३६ खाजगी रुग्णालयांना ७६० रेमडेसिविर वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:15 IST

जळगाव : कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी शनिवारी जिल्ह्यातील १३६ खाजगी रुग्णालयांना ७६० रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले असल्याची ...

जळगाव : कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी शनिवारी जिल्ह्यातील १३६ खाजगी रुग्णालयांना ७६० रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

२४ एप्रिल रोजी जिल्ह्याला ७६० रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणार्‍या ११७ खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन बेडच्या संख्येनुसार ३१५ रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या आहेत. तर १९ कोविड हाॅस्पिटलला ४३६ व्हायल्स कंपनीकडून घाऊक विक्रेत्यांमार्फत परस्पर वितरण होत आहे. तर प्राप्त साठ्यापैकी १० टक्के साठा हा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.

ओळख आवश्यक

संबंधित कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेसाठी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाच्या मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता अन्न व औषध कार्यालय येथे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांच्याकडील रेमडेसिविरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह औषध व प्रशासन आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकार्‍यांनी नियंत्रण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णालयनिहाय वाटपची दररोज यादी

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये, याकरीता दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची रुग्णालयनिहाय रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.