शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकूण ५०७ कोटी पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:09 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ठळक मुद्दे जिल्हा बँकेकडून ३२ टक्के कर्जवाटप उर्वरीत २६ राष्टÑीयकृत बँकांतर्फे १८ टक्के कर्जवाटप

जळगाव: खरीप हंगामाला प्रारंभ झाला असून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरीही लावली आहे. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाही खरीप पीककर्ज वाटपात दिरंगाई केल्याच्या तक्रारी असल्याने जिल्हाधिकाºयांनी सोमवार, ११ रोजी पीककर्जाबाबत सर्व बँकांच्या अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. त्यात जिल्हाबँकेसह सर्व २७ बँकांनी आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५०७ कोटींचे पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असून शेतकºयांना बियाणे व खते घेण्यासाठी पैशांची तातडीने गरज आहे. मात्र राष्टÑीयकृत बँकांकडून पीककर्ज वाटपास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही पीककर्ज दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तर शेतकºयांची बँक म्हणून ओळखल्या जाणाºया जिल्हा बँकेने कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना ५० टक्केच कर्ज देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र जे थकबाकीदार नाहीत, त्या शेतकºयांनाही कर्ज मिळत नसल्याची, दिरंगाई होत असल्याची तक्रार होती. त्यामुळे जिल्हाधिकाºयांकडून दर सोमवारी आढावा बैठक घेतली जात आहे. सोमवारी झालेल्या बैठकीस लीड बँक, जिल्हा बँक व सर्व राष्टÑीयकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते. कर्जवाटपात दिरंगाई होत असल्याने कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला आहे.उद्दीष्टाच्या १७ टक्के पीककर्ज वाटपसोमवार, ११ रोजी झालेल्या बैठकीत जिल्ह्यात सर्व २७ बँकांकडून आतापर्यंत वाटप झालेल्या पीककर्जाची माहिती जिल्हाधिकाºयांनी घेतली. जिल्ह्यात ५० हजार ५५२ खातेदार असून त्यांना २९४४ कोटींचे पीककर्ज वाटप करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेसह या सर्व २७ बँकांनी मिळून आतापर्यंत ५०७ कोटी म्हणजे उद्दीष्टाच्या जेमतेम १७ टक्केच कर्जवाटप केले आहे. जिल्हा बँकेने उद्दीष्टाच्या ३२ टक्के तर उर्वरीत सर्व बँकांनी १८ टक्केच कर्जाचे वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.