शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:49 IST

पावणेतीन लाखांच्या दारूसह साहित्य जप्त, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

पारोळा : येथील कासोदा रोडलगत असलेल्या के.आर.नगर भागात एका बंद घरात देशी-विदेशी बनावट दारूचा कारखाना चंद्रपूर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. यातून सुमारे पावणेतीन लाखांची बनावट दारू व साहित्य जप्त केले. ही कारवाई २५ जून रोजी करण्यात आली.बनावट दारू विक्रीप्रकरणी आरोपी साहेबराव अशोक देवरे रा. नाणे, ता. जि. धुळे हा चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात होता. त्याची सखोल चौकशी केली असता बनावट दारूचे खोके कुठून भरले, कारखाना कुठे आहे याबाबतची माहिती आरोपीकडून मिळाली. त्यानंतर २६ जून रोजी मध्यरात्री चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक साहेबराव म्हस्के यांना आरोपीने पारोळा येथील कासोदा रोडलगत असलेल्या के.आर.नगरमध्ये एका बंद घरात देशी-विदेशी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना दाखविला. प्राप्त माहितीवरून २६ रोजी मध्यरात्री पोलिस उपनिरीक्षक दीपक म्हस्के, पो.हे.कॉ. प्रशांत शेंडे, संजय चौधरी यांच्या पथकाने छापा टाकला. बंद घराचे कुलूप तोडून झडती घेतली असता भूषण ठाकरे रा. फागणे, ता.जि.धुळे (पूर्ण नाव माहीत नाही), दीपक पाटील (पूर्ण नाव, गाव, पत्ता माहीत नाही.) यांनी बनावट देशी-विदेशी दारूचा कारखाना उभारला. येथे बनावट दारू तयार करून बाटलीस संबंधित कंपनीचे बनावट बूच, कागदी लेबल लावले जाते.या कारवाईदरम्यान १ लाख ७३ हजार २८० रुपयांच्या बनावट दारूच्या सीलबंद काचेच्या ९१२ भरलेल्या बाटल्या, १९ खोके, ७ हजार रुपये किमतीचे बनावट दारू मिक्स करण्याचे यंत्र, २० हजार रुपये किमतीचे दारू बाटलीचे बूच सील करण्याच्या दोन मशीन, इतर वस्तू असे एकूण २ लाख ६४ हजार ४०६ रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. बनावट दारू विक्री तसेच ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ. आबा पंडित पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील दोन्ही आरोपींच्या विरोधात भा. दं.वि.कलम ३२८, ४२०, ४६८, महाराष्ट्र प्रॉव्हि. अ‍ॅक्ट कलम ६५ (क), (ख), (च) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर पारोळा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांच्यासह पोलीस कर्मचा-यांना पाचारण करण्यात आले.पारोळा पोलिस अनभिज्ञ५०० किलोमीटरवरून चंद्रपूर येथील रामनगर ठाण्याच्या पोलिस पथकाने पारोळा येथे येऊन बनावट दारूचा कारखान्यावर कारवाई केली. सर्रास चालत असलेल्या या प्रकाराबाबत पारोळा पोलीस आतापर्यंत अनभिज्ञ कसे राहिले, अशी दबक्या आवाजात चर्चा शहरात सुरू होती.दोन्ही आरोपी फरारछापा टाकण्यात आला त्यावेळी जिथे हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता ते घर बंद होते. त्यामुळे यातील मुख्य आरोपी सापडले नाहीत. ते गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाल्याचे समजले.