शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनिया पाठोपाठ आता जीवघेण्या ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’चा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 22:14 IST

जिल्ह्यात आढळले दोन सदृश रुग्ण : एका महिलेस औरंगाबादला हलविले तर दुस:यावर जळगावात उपचार

ठळक मुद्देजिल्ह्यात पहिल्यांदाच लागणमृत्यूचे प्रमाण अधिकजिल्ह्यात धोक्याचा इशारा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 -   शहर व जिल्ह्यात डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनियाने थैमान घातले.  आता तर  ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ (मेंदूज्वर प्रकारातील आजार) हा जीवघेणा आजार हल्ला करू पाहत असून जिल्ह्यात या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एका महिलेला औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी तत्काळ हलविण्यात आले आहे तर एका रुग्णावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनियाने शहरात थैमान घातले असताना उपाययोजनांकडे मात्र अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढहोतआहे.

‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ या आजाराने पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात हल्ला केला आहे. आता र्पयत दोन रुग्ण आढळले असून यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये रावेर तालुक्यातील एका महिलेला ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ सदृश आजाराची लागण झाल्याने तिला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून एका रुग्णावर जळगावात उपचार सुरू आहेत.  या रुग्णाच्याही पाठीतील पाण्याचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. या रुग्णाला डेंग्यू असल्याचाही अहवाल आला आहे. 

कितीही अंतरावरून पोहचू शकतो कुलेक्स डासकुलेक्स नावाच्या डासापासून ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ हा आजार होतो. ताप, डोकेदुखणे, उलटय़ा होणे, झटके येणे असे लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे केवळ घर अथवा इतर कोठेही जवळपास पाणी साचलेले नसले तरी या डासाने कोठेही व कितीही अंतरावर जाऊन चावा घेतला तर या आजाराची लागण होऊ शकते. ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ची  लागण झाली तर त्यामुळे मृत्यूचे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत असते. त्यामुळे असे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार घेणे व उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ या जीवघेण्या आजाराने डोके वर काढल्याने हा धोक्याचा इशारा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यात याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचाही सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. 

डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुन गुनिया पाठोपाठ आता ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ सदृश  आजाराचे रुग्ण आढळून येत असून याबाबत वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. - डॉ. उदयसिंग पाटील.

जळगाव जिल्ह्यात ‘जापनीस एन्सेफॅलिटिस’ सदृश आजाराचे दोन रुग्ण आढळून आले असून यातील एका महिलेला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे तर एका रुग्णावर जळगावात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांचा तसा अहवाल अद्याप आलेला नाही. - डॉ. तेजेंद्र चौधरी.