जामनेर : नगरपालिकेतील नगरसेवकांच्या एका गटाने पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरुड यांची शेंदुर्णी येथे शनिवारी भेट घेतल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. भाजपचे काही पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवकांनी गरुड यांची भेट घेतली. या
भेटीची राजकीय क्षेत्रात खुमासदार चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी गरुड यांनी राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य एका कार्यक्रमात केले होते. त्याचा संबंध या भेटीशी जोडला जात आहे.
काही दिवसांपूर्वी अंजुमन शिक्षण संस्थेच्या वादातून पोलिसात दाखल गुन्ह्यात गरुड यांनी समेट घडवून आणला होता. यावेळी भाजपच्या नगरसेवकांची त्यांचेशी झालेली जवळीक चर्चेचा विषय ठरली होती.
कोट
जामनेर नगरपालिकेतील काही नगरसेवकांनी आपली भेट घेतली. सामाजिक विषय व वैयक्तिक समस्यांवर चर्चा झाली. बीएचआर प्रकरणातील कारवाई हा राजकीय भूकंपाचा एक भाग होता. भूकंपाचा दुसरा टप्पा प्रतीक्षेत आहे.
- संजय गरुड, नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जामनेर