शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांची निराशा, उद्योगपतीधार्जिणा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प सर्वांना सावरेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने सामान्यांची निराशा ...

जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प सर्वांना सावरेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने सामान्यांची निराशा केली असून हा अर्थसंकल्प उद्योगपतीधार्जिणा असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले जात आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल

अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेला उभारी देणारा असून यातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण ठोस पाऊल टाकले आहे. कोविडच्या कालावधीत जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला असताना आपण कोरोनावर मात करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलले आहेत. याच्या जोडीला अर्थव्यवस्था गतिमान करण्याचा प्रयत्नदेखील केलेला आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे.

- गिरीश महाजन, माजी मंत्री

शेतकरी धोरणाला हरताळ

देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याची मोदी सरकारची घोषणा होती. त्‍याचप्रमाणे शेतकऱ्यांच्‍या शेतमालाल दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दिष्‍ट होते. ज्‍या मुद्यांवरून दिल्‍लीच्‍या वेशीवर लाखो शेतकरी आंदोलन करीत आहे. तोच मुद्दा या अर्थसंकल्‍पात दिसून येत नाही. हमीभावापोटी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये दिल्‍याचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. प्रत्‍यक्षात शेतकऱ्याच्‍या खात्‍यावर उत्‍पादनाचा खर्च निघेल एवढीदेखील रक्‍कम जमा झाली नाही. जगभरात कोरोना महामारीने अर्थव्‍यवस्‍था मोडकळीस आली. अर्थव्‍यवस्‍था मजबूत करण्याच्‍या दृष्‍टीने देखील ठोस धोरणांचा अभाव अर्थसंकल्‍पात आहे. सर्वसामान्यांसह शेतकरी हिताच्‍या धोरणाला यंदाच्‍या अर्थसंकल्‍पातही मोदी सरकारने हरताळ फासला आहे.

- डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस.

निराशाजनक

हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र फारसे काही पदरी पडलेले नाही. कृषी क्षेत्राचीही निराशा आहे. उद्योगांसाठी हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांचे यामुळे कंबरडे मोडले जाणार आहे.

- ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

सर्वच क्षेत्राची आर्थिक हानी झाली असताना आवश्यक उपाययोजना नाही. आरोग्यासाठी हवी तेवढी तरतूद नसून शेतीसाठीही आ‌वश्यक घोषणा नाही.

- ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस.

महाराष्ट्राला ठेंगा

आकस तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याच राज्यांना भरीव मदत, महाराष्ट्राला ठेंगा, नाशिक व नागपूरलासुद्धा राजकीय हेतूने मदत, रोजगार देण्याऐवजी कंपनीतील तरुणांना बेरोजगार करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना नवी योजना नाही, म्हणून हा राजकीय हेतूने प्रेरित अर्थसंकल्प आहे.

- गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख, शिवसेना