शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपंग युनिट शिक्षक समायोजन व थकीत वेतनाच्या प्रतीक्षेत, आदेश न पाळल्याने क्रांतिदिनी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:37 IST

अमळनेर : अपंग युनिटवर कार्यरत शिक्षकांना इतर शाळांमध्ये समाविष्ट करण्याचे व थकीत वेतन चार महिन्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ...

अमळनेर : अपंग युनिटवर कार्यरत शिक्षकांना इतर शाळांमध्ये समाविष्ट करण्याचे व थकीत वेतन चार महिन्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्यास एक वर्ष उलटूनही माध्यमिक शिक्षणाधिकारी आर्थिक प्रलोभनांच्या अपेक्षेने आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत. त्यामुळे शिक्षकांनी ९ आॅगस्ट रोजी क्रांतिदिनी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.गणेश नागो लिंगायत, दिनेश प्रकाश पाटील, महेंद्र धर्मा पाटील हे तिन्ही शिक्षक शिवाजी हायस्कूल, तांबेपुरा येथे अपंग युनिटवर काम करत होते. ते अतिरिक्त ठरले होते. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. गणेश लिंगायत, दिनेश पाटील यांच्या याचिकेवर ११ व १८ जुलै रोजी व महेंद्र पाटील यांच्या याचिकेवर २० व १८ जुलै रोजी अतिरिक्त शिक्षकांना इतर शाळांवर समायोजन करण्याचे आदेश दिले होते. तसेच चार थकीत वेतन चार महिन्यात देण्याचेही आदेश दिले होते. मात्र यावर माध्यमिक शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणून तिन्ही शिक्षकांनी पुन्हा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानुसार नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांचे समायोजन व थकीत वेतनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशित केले होते. याबाबत शिक्षकांनी वेळोवेळी विनंती अर्ज दिले आहेत. मात्र माध्यमिक शिक्षणाधिकारी हे समायोजन व थकीत वेतन मिळण्याकामी जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्यात दिरंगाई व कसूर करीत आहेत. त्यांना या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक प्रलोभनाची अपेक्षा आहे, असे वेळोवेळी त्यांच्या कार्यालयातील सूत्रांकडून व त्यांच्या दुफळी बोलण्यातून जाणवत आहे. त्यामुळे तातडीने समायोजन करून थकीत वेतन द्यावे. अन्यथा ९ आॅगस्टला क्रांतिदिनी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपोषणास बसू, असा इशारा गणेश लिंगायत, दिनेश पाटील, महेंद्र पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारीकडे यांना दिला आहे.