जळगाव : पिंप्राळा भागातील मयूर कॉलनीत प्रॉपर्टीच्या वादातून योगिता मुकेश सोनार यांचा दीर दीपक सोनार याने डोक्यात कुऱ्हाड मारून खून केला होता. याप्रकरणी दीपक याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी कामकाज होऊन तो अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे.
योगिता सोनार यांच्या पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीच्या वादातून दीपक याने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला होता. याप्रकरणी दीपकसह त्याची आई प्रमिलाबाई व नातेवाईकांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दीपक याला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. दरम्यान, सध्या तो कारागृहात आहे. जामीन मिळावा यासाठी त्याने जिल्हा सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शुक्रवारी कामकाज झाले. सरकार पक्षातर्फे ॲड. मोहन देशपांडे यांनी जोरदार युक्तिवाद करून जामिनावर हरकत घेतली. अखेर सुनावणीअंती न्यायालयाने संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
---------------