शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शाळेला डिजिटल झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:48 IST

चाळीसगावं बेलगंगा टेन्किकल शाळेचे रुपडे खुलले, मंगळवारी उदघाटन 

चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना येथील बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे तब्बल आठ वर्ग डिजिटल करण्यासाठी निधी उभारला आहे.  मंगळवारी या  आदर्शवत उपक्रमाचे  लोकर्पण होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे यांची प्रेरणा यासाठी महत्वाची ठरली. 

बेलगंगा साखर कारखाना वसाहतीवर बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविले आहे. शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे यांनी काही माजी विद्यार्थ्यांजवळ आपला मानस बोलून दाखवला आणि शाळेचे डिजिटलायजेशनाचे रोप रोवले गेले. आणि पाहता पाहता माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. फेसबुक, व्हॉटस्अॕपच्या माध्यमातून सगळे माजी विद्यार्थी ढगे यांच्याशी जोडले गेले. काहींनी थेट शाळेत येवून मदत केली तर काहींनी आपल्या मित्रांच्या हातोहात मदत पोहच केली. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीतून आठ वर्गांसाठी प्रत्येकी ५० इंची स्मार्ट अ‍ॅण्डड्रॉइड टीव्ही संच आणि वर्गाचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेला पेन ड्राईव्ह खरेदी करण्यात आला आहे. या भरघोस निधीसाठी सन १९९० ते २००५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली आहे.

# मंगळवारी उद्घाटन

दोन  रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजता बेलगंगा शाळेत शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या हस्ते आणि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.  विनोद कोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आदर्शवत कामाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री एम. के. पाटील हे असतील. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी  सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी  विलास भोई  हे देखील उपस्थित राहणार आहेत.