शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

पथसंचलनात डिजिटल इंडियाचा नारा

By admin | Updated: January 20, 2017 00:22 IST

तरुणाईने वेधले लक्ष : सामाजिक प्रबोधनासह मराठमोळी लोकसंस्कृती आणि परंपरेचे दर्शन

फैजपूर : 1936  मध्ये काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनाने देशाच्या पटलावर आपला वेगळा ठसा उमटवणा:या फैजपूरच्या पावन भूमीवर सळसळत्या तरुणाईच्या जोशात गुरुवारी दुपारी अडीच वाजता पथसंचलनाने सुरुवात झाली़ डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, अंधश्रद्धा निमरूलन, स्त्रीभ्रूणहत्या, दहशतवाद, राष्ट्रीय एकात्मतेवर लक्ष वेधून तरुणाईने देखाव्यातून लोकसंस्कृती जिवंत असल्याचे दर्शनही घडवल़े अत्यंत शिस्तबद्धरित्या सुरू झालेल्या पथसंचलनाला फैजपूरकरांनी तेव्हढय़ाच उत्स्फूर्ततेने दाद दिली़पथसंचलनाने वेधले लक्षधनाजी नाना महाविद्यालय व उमवि, जळगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 व्या युवारंग महोत्सवाला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पथसंचलनाने सुरुवात झाली़ तत्पूर्वी, युवारंगचे स्वागताध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी स्व़ स्वातंत्र्य सैनिक धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली. तसेच त्यांच्यासह कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील व  प्राचार्य पी़आऱ चौधरी यांनी 1936 च्या ग्रामीण अधिवेशनाची स्मृती जागवणा:या प्रेरणास्तंभावर पुष्पचक्र अर्पण केल़े त्यानंतर हिरवी ङोंडी दाखवून पथसंचलनाला प्रारंभ झाला़ कार्यक्रमास यांची उपस्थितीप्रभारी कुलसचिव डॉ़ए़बी़ चौधरी, प्रा़ सत्यजीत साळवे, संजय शेखावत, तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन लीलाधर चौधरी, संस्था पदाधिकारी एम़टी़ फिरके, एस़क़ेचौधरी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही़आऱ पाटील, प्राचार्य आऱएल़ चौधरी, प्राचार्य जयश्री नेमाडे, विद्यार्थी प्रतिनिधी विशाखा महाजन, नगरसेवक मिलिंद वाघुळदे, नगरसेवक अमोल निंबाळे, युवा रंग समन्वयक प्रा़ए़आय़ भंगाळे, उपप्राचार्य उदय जगताप, डी़बी़ तायडे, अनिल सरोदे यांची उपस्थिती होती़पथसंचलनात उमवि कार्यक्षेत्रातील 55 महाविद्यालयातील हजारो विद्याथ्र्यानी सहभाग नोंदवला़ युवारंगसाठी 99 महाविद्यालयांनी नोंदणी केली असलीतरी काही संघ शुक्रवारी दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ तीन तास पथसंचलनदुपारी अडीच वाजेच्या सुमारास धनाजी नाना महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी  महाराज प्रवेशद्वारापासून पथसंचलनाला सुरुवात झाली़ पथसंचलनाच्या अग्रभागी यजमान धनाजी नाना महाविद्यालयाच्या भालदार, चोपदारांसह एनसीसी विद्याथ्र्यानी शिस्तबद्ध केलेली परेड लक्षवेधी ठरली़ मराठमोळी संस्कृती जपत नऊवारी साडी, डोक्यावर भगवा फेटा असा पेहराव करीत विद्यार्थिनींनी लेझीम खेळत लक्ष वेधल़े पथसंचलन सुरू होऊन सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड, ब्राrाण गल्ली, रथगल्ली, लक्कडपेठ मार्गाने शोभायात्रा पुन्हा महाविद्यालयात पाच वाजेच्या सुमारास पोहोचली़ तब्बल तीन तास चाललेल्या पथसंचलन शोभायात्रेने फैजपूरकरांच्या डोळ्यांचे पारण फेडल़े शोभायात्रेचे स्वागतशहरातून निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल़े शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले तर काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली़चोख बंदोबस्त पथसंचलनादरम्यान विद्याथ्र्याना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपनिरीक्षक रामलाल साठे, आधार निकुंभे व सहका:यांनी संपूर्ण तीन तास कडेकोट बंदोबस्त राखला़