शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST

स्टार १०५१ विजयकुमार सैतवाल जळगाव : कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यात भेसळ केली असल्यास त्याचे गंभीर परिणाम सहन करावे ...

स्टार १०५१

विजयकुमार सैतवाल

जळगाव : कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यात भेसळ केली असल्यास त्याचे गंभीर परिणाम सहन करावे लागू शकतात. त्यामुळे मिठाई असो की कोणताही खाद्यपदार्थ, तो खरेदी करण्यापूर्वी त्यात भेसळ तर नाही ना, याची खात्री करून घेण्याचा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दिला जात आहे.

आता सणासुदीच्या काळात असे प्रकार जास्त घडतात, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचेही सांगितले जात आहे. कोरोना काळात अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतलेल्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली आहे.

सणासुदीचे दिवस जवळ आले की, खवा, मावा तसेच इतर पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार घडत असतात. यावर अनेकवेळा कारवाईदेखील होते. मात्र हे प्रकार थांबत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. दररोज वापरात येणारी डाळ असो, चॉकलेट तयार करण्यासाठी लागणारी साखर असो, त्यात कोरोना काळात भेसळ होताना आढळून आली होती.

कोरोनाचा संसर्ग पसरला आणि शासकीय यंत्रणा उपाययोजनांमध्ये अडकली. या काळात त्याचा गैरफायदा घेत अनेकांनी या काळात संधी साधत भेसळीचा प्रयत्न केला. मात्र कारवाई झाल्याने हा प्रकार वेळीच रोखला गेला.

भेसळ किती?

२०२० :

- औद्योगिक वसाहत परिसरातील डाळ उत्पादन कंपनीत डाळीला चकाकी येण्यासाठी पावडर लावली जात असताना, हा माल जप्त करण्यात आला.

- डिसेंबर २०२० मध्ये पाचोरा येथे चॉकलेट निर्मिती कंपनीत भेसळयुक्त ब्राऊनशुगर (चॉकलेटसाठी वापरण्यात येणारी साखर) वापरली जात असताना त्याची २०० पोती जप्त केली.

२०२१ :

- दूध, तूप, तेल यांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविले. त्यांचा अहवाल आल्यानंतर भेसळीचे प्रमाण समजणार आहे.

खरेदी करताना घ्या काळजी...

कोणताही पदार्थ खरेदी करताना त्याविषयी संशय असल्यास खात्री करावी. तसेच प्रत्येक वस्तूचे पक्के बिल घ्यावे. जेणेकरून काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.

दोन्ही मोठ्या तपासणीत भेसळ

डिसेंबर २०२० मध्ये पाचोरा येथे चॉकलेट निर्मिती कंपनीतून घेण्यात आलेल्या ब्राऊनशुगरमध्ये भेसळ असल्याचा अहवाल आला होता. तो मान्य नसल्याचे कंपनीचे म्हणणे होते. हे नमुने म्हैसूर येथे तपासणीसाठी पाठविले असता, तेथील अहवालातही यामध्ये भेसळ असल्याचे म्हटले होते. तसेच डाळींचे नमुनेही भेसळयुक्त असल्याचे आढळून आले होते.

सणासुदीत अधिक भेसळ

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर उपवास व विविध सण सुरू होतात. यापुढेही गणेशोत्सव व इतर सणवार येतील. या सणासुदीच्या काळात अधिक भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी सुरूच असते. यामध्ये कोरोना काळातही डाळ तसेच चॉकलेट कंपनीत भेसळ होत असल्याचे आढळून आले होते. आता सणासुदीच्या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कोठेही नियमांचा भंग झाल्यास कारवाई अटळ आहे.

- विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग.