शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धुतरुम एक आनंद आणि बरंच काही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:25 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात लिहिताहेत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना. आंधळे...

प्रमाण भाषा असो वा बोलीभाषा तिच्याठायी सौंदर्याची कुपी ही असतेच असते. मुळातच सुंदर असलेली ही भाषा नेटकं बोलणाऱ्याकडून अधिक सुुंदर होत जाते. कधी-कधी तर साधा एक शब्दसुद्धा भाराभार बोलण्याची गरजही भासू देत नाही. अशावेळी भाषिक सौंदर्यासोबत भाषिक सामर्थ्याचेही दर्शन घडून जाते. या सबंध पृच्छेचे कारणही मोठे मजेदार आहे. त्याचे हे सूतोवाच.काही महिन्यांपूर्वी एका वरिष्ठ महाविद्यालयात वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून परीक्षा घेण्यासाठी गेलो असतानाचा हा प्रस्तूत प्रसंग. त्या प्रसंगात तिथल्या एका कारकुनाने उच्चारलेला ‘धुतरूम’हा शब्द मला आनंद देत लिहितं करून गेला. संबंधित महाविद्यालयाचे ते लिपिक तावातावाने ‘तुझे हे धुतरूम अजिबात चालणार नाही’ असे एका विद्यार्थ्यास बोलून गेले. त्यांच्या या उच्चारासरशी माझ्या कानापासून मनापर्यंत आणि मनापासून नखशिखांत सुखसंवेदना अक्षरश: पाझरल्या. त्याचं कारण ‘धुतरूम’ हा शब्द माझ्या घरात आजी-आजोबाकडून कधी गल्लीतल्या घरांमधून तर कधी खेळ खेळताना सवंगड्याकडून पण आताशा हाच शब्द अडगळीत पडल्यामुळे त्याचे अकस्मात झालेले उच्चारागमन मला मात्र आनंद देऊन गेले, एवढे मात्र खरे.बालपणी शब्दांभोवती तितकंसं न रमणारं मन मोठेपणी अध्यापन क्षेत्रात आल्यामुळे म्हणा वा सृजनांची देणगी मिळाल्यामुळे म्हणा शब्दांभोवती रुंजी घालायला लागतं. त्याचाच परिणाम म्हणून ‘धुतरूम’ या शब्दाच्या निर्मितीच्या जिज्ञासेपासून तर या शब्दाठायी असलेल्या नानाविध अर्थछटा मनात तरळू लागल्या. ‘धुतरूम’ हे विशेषण आहे की क्रिया विशेषण या व्याकरणिक-अंगापासून यास कोणत्या भाषिक अलंकारात बसवावे येथपर्यंत माझे मन गिरक्या व घिरट्या घालू लागले. तोच तेच सद्गृहस्थ माझ्याजवळ येत त्याच शब्दाचा पुनरूच्चार करीत वदले. ‘काय करावं सर, सध्या विद्यार्थ्यांचे धुतरूम वाढलेहेत.’ यावेळी मात्र माझी उत्सुकता ‘धुतरूम’ या शब्दाच्या नेमक्या अर्थासाठी अधीर झाली; अन् त्यांनाच विचारता झालो, ‘भाऊसाहेब धुतरूम म्हणजे काय हो?’ त्यांनी माझ्या या प्रश्नावर हास्यकटाक्ष टाकीत ‘काय मजा घेता मराठीचे अभ्यासक’ असे म्हणत माझ्या प्रश्नाची बोळवणच केली. माझा हट्ट कायम असल्याचे पाहून भाऊसाहेबांनी ‘धुतरूम’ या शब्दाचा अर्थ रिकामी कामं’ असे सांगून माझे समाधान केले. पण या शब्दार्थाने माझे समाधान मात्र झाले नाही. परीक्षेचे कामकाज यथोचित आटोपून घराकडे परतताना या शब्दानं विविध अर्थाछटांसह मनात थैमानच घातलं; अन् बोलीभाषेचं सौंदर्य किती व्यापक आणि वर्धिष्णू असतं या विचारानं आनंदात भरच पडली.बालपणी यात्रेतून खेळणं घेऊन दिलं नाही म्हणून घरी येऊन मी केलेली आदळआपट पाहून ‘असे धुतरमं करू नको’ असे आजी म्हणाली. त्यावेळी ‘असे नाटकं करू नको’ हा अर्थ आजीला अभिप्रेत होता. खेळ खेळताना कुणी रडीचा डाव खेळायला लागला तर हे धुतरूम चालणार नाही म्हणजे जिवावर येणं चालणार नाही. हा अर्थ आज उमगला. दारू पिऊन येणाºया नवºयाला ‘तुमच्या या धुतरूमाचा कंटाळा आलाय’ असं म्हणणाºया बाईला दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा कंटाळा आल्याचे आज समजते. काही काम करायचे नसल्यास ‘तुझे धुतरमं मला चांगलेच ठाऊक आहेत? म्हणजे कारणं ठाऊक आहेत. याचाही आज रोजी मला शोध लागला.थोडक्यात काय, एकच शब्द वेगवेगळ्या प्रसंगाचे वर्णन सौष्ठवासह अर्थसौष्ठत्वातही कशी भर घालतो याचा प्रत्यय माझ्यातल्या शिक्षकाला मात्र यानिमित्ताने आला. अन् माझ्यातला कवी यानिमित्ताने बालपणातल्या भूतकाळातच हळूच शिरू लागला. अडगळीत गेलेल्या इतर दुसºया शब्दांसाठी तेव्हा तुम्ही माझ्या या वेडेपणाला धुतरूम म्हटला तरी माझी काही एक हरकत नाही. उलट आनंदच आहे.-प्रा.वा.ना. आंधळे, धरणगाव, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव