धुळे : घराच्या धाब्यावरून उडून गेलेली ताडपत्री काढण्यास गेल्याच्या क्षुल्लक कारणावरून तालुक्यातील चौगावला दोन गटात हाणामारी झाल्याची घटना 25 रोजी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पहिल्या गटाकडून महेंद्र अंकुश बोरसे (रा.चौगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी दिलीप उखा गर्दे (रा.नाशिक), जगदीश उखा गर्दे (रा.धुळे) व राणुबाई उखा गर्दे (रा.चौगाव) यांनी फिर्यादी महेंद्र बोरसे यांच्यासह त्यांचा भाऊ जितेंद्र अंकुश बोरसे व आई लक्ष्माबाई अंकुश बोरसे यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. महेंद्र बोरसे यांची ताडपत्री दिलीप गर्दे यांच्या घराच्या धाब्यावर उडून गेली होती. ती ताडपत्री काढण्यास गेल्याचा राग आल्याने संशयितांनी मारहाण केली. हाणामारीत काठीने डोके फोडून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर भादंवि कलम 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हे. कॉ. ए.जी. जाधव करीत आहेत. दुस:या गटाकडूनही फिर्याद दुस:या गटाकडून दिलीप उखा पाटील (रा.चौगाव, ह.मु. श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी जितेंद्र अंकुश बोरसे, महेंद्र अंकुश बोरसे व अंकुश हरी बोरसे (रा.चौगाव) यांनी फिर्यादी दिलीप पाटील यांच्यासह त्यांचे भाऊ जगदीश उखा पाटील यांना मारहाण केली. धाब्यावरून उडून गेलेल्या ताडपत्रीवरून दिलीप पाटील यांच्या आईला शिवीगाळ केल्याने हा वाद झाला. हाणामारीत संशयितांनी कु:हाडीने वार करीत डोके फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहेत. त्यात पहिल्या गटातील महेंद्र अंकुश बोरसे, जितेंद्र अंकुश बोरसे व लक्ष्माबाई अंकुश बोरसे यांचा, तर दुस:या गटातील दिलीप उखा पाटील व जगदीश उखा पाटील यांचा समावेश आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर भादंवि कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. तपास हे. कॉ. एस.आर. निकम करीत आहेत.
चौगावला दोन गटात धुमश्चक्री
By admin | Updated: September 27, 2015 00:02 IST