शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोपडा तालुक्यातील धानोरा पेटले, एकाच दिवशी २४ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 21:51 IST

धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब घेणे सुरू झाले असल्याने १६ रोजी ६५ रुग्णांचा स्वॅब घेतला. त्यापैकी २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने धानोरा सह परिसरात घबराहट निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१०८ क्रमांकाच्या गाडीचालकांनी दिला नकारपॉझिटिव्ह रुग्ण आले मोटारसायकलवरून

संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : शहर आणि तालुक्यात कोरोना व्हायरस थांबता थांबत नसून त्याचे उग्र रूप दाखवायला त्याने सुरुवात केली असून, तालुक्यात एकाच दिवशी ५० ते १०० रुग्णांपर्यंत संख्या यायला सुरुवात झाली आहे. अर्थात ही संख्या वाढायला कारण म्हणजे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येसुद्धा संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात असल्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली आहे. परंतु असे असले तरी सुरुवातीच्या तीन महिन्यात तालुक्यातील धानोरा येथे एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नसताना गेल्या दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता. मात्र धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वॅब घेणे सुरू झाले असल्याने १६ रोजी ६५ रुग्णांचा स्वॅब घेतला. त्यापैकी २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने धानोरा सह परिसरात घबराहट निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना चोपडा येथे कोविड रुग्णालयात आणण्यासाठी १०८ रुग्णवाहिका चालकांनी नकार दिला. अर्थात धानोरा येथील १०८ रुग्णवाहिका उल्हास पाटील रुग्णालयात गेली होती, परंतु तिकडून जळगाव येथे सामान्य रुग्णालयातच १०८ रुग्णवाहिकेला थांबवून घेतल्याने धानोरा परिसरात १०८ रुग्णवाहिकेची सेवा मिळू शकत नाही. २४ रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णवाहिकेची गरज होती. मात्र चोपडा व इतर परिसरातील १०८ रुग्णवाहिका चालकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश कवडीवाले यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला. तेव्हा धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ रुग्णवाहिका चालकाने १६ रुग्णांना दोन फेऱ्यांमधून चोपडा येथील रुग्णालयात पोहोचविले. मात्र २४ पैकी सोळाच रुग्ण आल्याने आठ रुग्णांना स्वत:च्या मोटारसायकलद्वारे चोपडा येथे रुग्णालयात उपचारासाठी यावे लागले. या मोटरासायकल पॉझिटिव रुग्णांच्या नातेवाईकांवर पूर्णपणे सॅनिटायझर करून पुन्हा परत घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर आली, अर्थात असे होत असेल तर दररोज रुग्णांची संख्या तीन आकडीमध्ये यायला लागेल हे नाकारता येणार नाही. म्हणून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला येथे आता रुग्णांची संख्या वाढत असल्याने परत सेवेसाठी पाठवावे, अशी मागणी धानोरा परिसरातून नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChopdaचोपडा