शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

७५ दिवस मनपाच्या घंटागाड्या पडणार धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:33 IST

नवीन घंटागाड्यांच्या वापरासाठी ठेक्याची गरजच काय ?

ठळक मुद्दे दैनंदिन वापर करण्याची आवश्यकता

जळगाव : महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३२ कोटी रुपयांच्या डीपीआरमधून मनपाने ७ कोटी रुपयांमध्ये ८५ घंटागाड्या घेतल्या असून, सर्व गाड्या या मनपाच्या आवारात काही दिवसांपासून पडून आहेत. तसेच आचारसंहितेचा बहाण्याने या गाड्या आता तब्बल ७५ दिवस मनपाच्या आवारात धुळखात पडणार आहेत.शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या ही आचारसंहिता आहे किंवा नाही ? यावर अवलंबून नाही. त्यामुळे मनपाला या नव्या घंटागाड्याचा वापर करण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट का पहावी लागत आहे ? असा प्रश्न नगारिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरात खासगी मक्तेदार व मनपा प्रशासनाकडून कचरा संकलनाचे काम सुरु आहे. त्यामुळे नव्याने प्राप्त झालेल्या घंटागाड्याचा वापरासाठी मनपाला मुहूर्त काढण्याची गरजच काय आहे ? ७५ दिवस या गाड्या मनपाच्या आवारात धुळखात ठेवण्यापेक्षा त्या गाड्यांचा वापर दैनंदिन कचरा संकलनासाठी करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.एकमुस्त सफाईच्या ठेक्याला अजून लागतील तीन महिेनेसंपूर्ण शहरासाठी एकच ठेका दिला जाणार असून, यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे निविदा अंतीम होवू शकलेली नाही. तसेच हा ठेका दिल्यानंतरच या वाहनांचा वापर केला जाणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली. मात्र, या ठेक्याची प्रक्रियेला आचारसंहितेनंतरच सुरुवात होईल यासाठी जवळपास तीन महिन्यांचा काळ जाणार आहे. दरम्यान, ८५ घंटागाड्याचा वापर एकमुस्त ठेका दिल्यानंतरच होणार असेल तर मोबाईल टॉयलेट, जेसीबीचा वापर का केला जात नाही ? हे देखील सुटणारे कोडं आहे. मनपा प्रशासनाच्या आवारात लावण्यात आलेल्या जेसीबी व मोबाईल टॉयलेटचा वापर तरी मनपाने करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.आधीच ७ महिने उशिराने राबविली खरेदीची प्रक्रियामनपा प्रशासनाला मार्च २०१८ मध्येच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ३२ कोटी रुपयांचा डिपीआर मंजूर होवून, एप्रिल २०१८ मध्ये ९ कोटी रुपयांचा निधी मनपा प्रशासनाला प्राप्त देखील झाला होता. मात्र, मनपा प्रशासनाकडून वाहन खरेदीसाठी किंवा डिपीआरची अंमलबजावणीसाठी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. जी प्रक्रिया मनपाच्या वाहन विभागाने करायला हवी होती. ती प्रक्रिया मनपा आरोग्य विभागाकडून राबविण्यात आली. तब्बल सात महिन्यानंतर वाहन खरेदीचा प्रस्ताव जीईएम पोर्टलवर करण्यात आला. त्यानंतर ही वाहने मनपाला प्रस्ताव पाठविल्यानंतर दोन महिन्यांचा अवधीनंतर दोन टप्प्यात प्राप्त झाली असून, त्याचा देखील वापर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.आचारसंहिता लागणार हे माहित असतानाही उशिर का ?मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार होती. हे जगजाहीर होते. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्याआधीच वाहन खरेदीचा प्रस्ताव पाठविण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. आता वाहने प्राप्त झाल्यानंतर घंटागाड्यांचा वापरासाठी आचारसंहितेचा खोडा आणला जात आहे. त्यामुळे या घंटागाड्या खरेदी करण्यासाठी मुद्दामहून आचारसंहितेची वाट पाहण्यात आली का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तसेच सर्व वाहने मनपाच्या पार्किंगमध्ये ठेवण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत या वाहनांच्या सुरक्षेविषयी देखील प्रश्न उपस्थित होतो. हे वाहने अडथळीचेही ठरु लागले आहेत.