शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

बर्फवृष्टी व वादळाचा तडाखा, जळगाव जिल्ह्यातील भाविक केदारनाथाच्या दर्शनापासून भाविक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:27 IST

जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक मात्र सुरक्षित

ठळक मुद्देसहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथदौरा थांबविला

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या जिल्ह्यातील भाविक व पर्यटकांचा दौरा विस्कळीत झाला असून वादळामुळे भाविकांचे केदारनाथाचे दर्शन होऊ शकले नाही. मात्र जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती टूर कंपन्यांनी दिली.दरवर्षी मे ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यातील हजारो भाविक चारधाम यात्रेसह काश्मीरात पर्यटनास व दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार यंदाही हा हंगाम जोरात सुरू असून जिल्ह्यातून भाविक चारधाम यात्रेला गेलेले आहे. मात्र उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यात काहीसे चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता सर्व भाविक, पर्यटक सुरक्षित आहेत. मात्र यात्रा काहीसी विस्कळीत झाली.सहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथचारधाम यात्रेसाठी गेलेल्या जिल्ह्यातील भाविकांपैकी काही भाविक केदारनाथला जात असताना केदारनाथ मंदिर केवळ सहा कि.मी. अंतरावर राहिले व रस्ता बंद झाला आणि प्रशासनाने भाविकांना परत पाठवित सुरक्षित ठिकाणी मुक्कामी ठेवले. थोड्याच अंतरावर मंदिर असताना दर्शन न झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला.पहेलगाम जाण्यास रोखलेचारधामसह काश्मीरातही पर्यटक गेले असून काश्मीरात तामिळनाडूतील एका पर्यटकाच्या हत्येनंतर काहीसे वातावरण गंभीर होऊन सध्या तेथे परिणाम जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यातीलही काही पर्यटक काश्मीरात पैलगामला जात असताना त्यांना तेथे रोखण्यात आले. मात्र श्रीनगर येथे सहज जाता येत असल्याचे काही जणांनी सांगितले.दौरा थांबविलाएका टूर कंपनीकडून ३२ भाविकांचा गट १५ मे रोजी चारधाम यात्रेसाठी जाणार होता. मात्र सध्याची स्थिती पाहता हा दौरा थांबविला असल्याची माहिती टूर कंपनीने दिली. या कंपनीकडून जूनमध्येही आरक्षण असून ते रद्द सध्यातरी होणार असल्याचे चित्र असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.अनेक जाण्यास तयारसध्या सुट्यांमुळे काश्मीर, उत्तराखंडकडे जाणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण असून वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे आता जे दौरे ठरले आहे, ते रद्द न करता अथवा न थांबविता ते होणारच असल्याचे काही कंपन्यांनी सांगितले. यामध्ये पर्यटकच उत्सुक असून काश्मीरात जाण्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार १४ मे रोजी एक गट जाणार आहे.जिल्ह्यातून उत्तराखंड व काश्मीरात भाविक व पर्यटक गेले असून ते सर्व सुरक्षित आहेत. रस्ता बंद झाल्याने काही भाविकांचे केदारनाथचे दर्शन होऊ शकले नाही.- लक्ष्मण अमृतकर, ट्रॅव्हेल्स संचालक.उत्तराखंडातील वातावरणामुळे १५ रोजी जाणारा गट थांबला आहे. मात्र सध्या पर्यटकांना तेथे काही अडचण येत नाही.- मनीष जोशी, ट्रॅव्हेल्स संचालक.

टॅग्स :Jalgaonजळगाव