शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील उड्डाणपुलालगत हरित पट्टा विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:17 IST

वन्यजीव संरक्षण संस्थेची मागणी : महामार्ग प्राधिकरण संचालकांना निवेदन (फोटो मेल केले आहेत) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून ...

वन्यजीव संरक्षण संस्थेची मागणी : महामार्ग प्राधिकरण संचालकांना निवेदन

(फोटो मेल केले आहेत)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला लागून तयार करण्यात येणाऱ्या सेपरेटरचे संपूर्ण काॅंक्रिटीकरण न करता, त्याठिकाणी हरित पट्टा विकसित करावा, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेने केली आहे. याविषयी बुधवारी वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग संचालकांना निवेदन दिले. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला शक्य नसल्यास वन्यजीव संरक्षण संस्थेच्या मा‌ध्यमातून वृक्षाराेपण करण्याची तयारी असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शहरातून प्रभात चौक, दादावाडी परिसर व गुजराल पेट्रोल पंप याठिकाणी महामार्गालगत तीन उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत. याठिकाणी पुलाखाली काँक्रिटचे सेपरेटर बांधण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून केली जात असून, यामुळे भविष्यात याठिकाणी अतिक्रमण होऊन वाहनांनादेखील अडचणीचे ठरू शकते. उड्डाणपुलाच्या भिंतीला वाहनांची धडक बसू नये म्हणून दीड ते दोन मीटरचे सेपरेटर पुरेसे आहे. मोठा पूल असल्यास ४ ते ५ मीटरचे सेपरेटर पुरेसे होऊ शकते. या पुलाखालून नियमित अवजड वाहने वापरणार नाहीत, किमान तेवढी जागा सोडून इतर पट्ट्यात झाडेझुडुपे लावल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य राहील. प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होईल, हा विचार करायला हवा, असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सेपरेटरच्या भागात गरजेपेक्षा जास्त रुंद काॅंक्रिट जंगल तयार करू नये. तसेच आवश्यक तेवढे दीड-दोन मीटरचे सेपरेटर तयार करुन ज्याभागात वाहने वळण घेतात, तिथे लहान आकाराची झाडेझुडपे लावल्यास अपघात होणार नाहीत. पशुपक्षी आणि पर्यावरणालादेखील याचा मोठा फायदा होईल. संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ तशा सूचना देऊन आवश्यक तितके काँक्रिटीकरण करून उर्वरित जागेत वृक्षारोपण करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे निवेदन देण्यात आले आहे.

कोट..

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला शक्य नसेल तर या परिसरात वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे झाडे लावू शकतो. तशी परवानगी द्यावी अन्यथा संबंधित ठेकेदाराला त्या जागेत झाडे जगविण्याची सूचना द्यावी. - बाळकृष्ण देवरे, सदस्य, वन्यजीव संरक्षण संस्था

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात याप्रकारे उड्डाणपुलाखाली सर्व्हिस रोडवर सेपरेटर बांधण्यात येणार आहेत. जर त्या सर्वच ठिकाणी ९ मीटर जागा काँक्रिटीकरणात वाया जाणार असेल तर यावर विचार व्हायला हवा.

- सतीश कांबळे , वन्यजीव अभ्यासक.

वळणावर झाडे लावल्यास व्हिजन कट होऊन अपघात घडतील, अशी भीती व्यक्त हाेते. परंतु, दाेन ते तीन फुटांपर्यंत वाढणारी लहान शोभिवंत झुडपे अथवा शिंदीसारखे सरळ वाढणारे झाड लावल्यास व्हिजन कट होणार नाही. - रवींद्र फालक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था.