शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या तीन किमी पर्यत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:53 IST

रविवारी मध्यरात्री पासून वाहतूक खोळंबली

ठळक मुद्देअवजड वाहनांसह प्रवाशी वाहनेही अडकून अवजड वाहने वाढल्याने वाहतूक थांबली

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव,  दि. 30 - राष्ट्रीय महामार्ग  क्र. 211वर (धुळे - सोलापूर) कन्नड घाटात सोमवारी पहाटेपासून वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या तीन कि.मी. पर्यत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अवजड वाहनांसह प्रवाशी वाहनेही अडकून पडली आहे. गेल्या महिन्यात पावसामुळे चाळीसगाव शहरापासून 15 कि.मी. अंतरावर कन्नड घाटातील रस्ता दोन ठिकाणी खचला. रस्ता दुरुस्तीसाठी घाटातील वाहतूक थांबविण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यामुळे घाटातील वाहनांची संख्या वाढल्याने ट्रॉफीक जाम होण्याचे प्रसंग वारंवार येत आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला होता. तिथे अजूनही एकेरी वाहतूक होते. यामुळे दोन वाहने समोरासमोर येऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे अवजड वाहने वाढल्याने वाहतूक थांबली. यात बसेससह प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनांचाही समावेश आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांची रांग मोठी होत आहे. राजमार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांनीदेखील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लक्ष देण्याची मागणी असून ट्रॉफीक जाममुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.