शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

कमी स्ट्राइक रेट तरीही आयपीएलमध्ये ३ हजारांपेक्षा जास्त धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:15 IST

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच असे खेळाडू आहेत. ज्यांनी ३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र, त्यांचा स्ट्राइक रेट हा ...

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच असे खेळाडू आहेत. ज्यांनी ३ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र, त्यांचा स्ट्राइक रेट हा खूपच कमी आहे. त्यात सध्या दिल्लीकडे असलेल्या अजिंक्य रहाणे, शिखर धवन यांचा समावेश आहे.

रहाणे याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५० सामन्यांत ३९३३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट हा १२१.३८ एवढाच राहिला आहे. तीन हजारांपेक्षा जास्त धावा करूनही त्याचा स्ट्राइक रेट सर्वांत कमी आहे. त्याने राजस्थान रॉयल्स, रायजिंग सुपरजायंट्स पुणे यांच्याकडून खेळ केला आहे. आता तो दिल्लीच्या ताफ्यात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने देखील १७७ सामन्यांत ५२८२ धावा केल्या आहेत. तो सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने आयपीएलमध्ये ६०१ चौकार लगावले आहेत. तरीदेखील त्याच स्ट्राइक रेट हा १२७.२७ ए‌वढाच आहे. तर त्यासोबतच मनीष पांडे १२१.५८, रायुडू १२६.१८ आणि केकेआरला दोन वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार गंभीर १२३.८८ यांचाही स्ट्राइक रेट इतर फलंदाजांच्या तुलनेने कमी आहे. तरीदेखील हे यशस्वी फलंदाज आहे. यातील गंभीर निवृत्त झाला आहे. तर अजिंक्य रहाणेला गेल्या सत्रात फारशी संधी मिळाली नाही. या सत्रात देखील दिल्लीच्या फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजीत त्याची पारंपरिक फटके मारण्याची शैली वेगळी आहे.

३००० पेक्षा जास्त धावा पण स्ट्राइक रेट कमी असलेले फलंदाज

अजिंक्य रहाणे (दिल्ली) १२१.३८

मनीष पांडे (हैदराबाद) १२१.५९

गौतम गंभीर १२३.८८

अंबाती रायुडू (चेन्नई) १२६.१८

शिखर धवन १२७.२७