शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचा ‘मनस्ताप’ कधी दूर होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:39 IST

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना जळगाव, पाचोरा व चाळीसगाव स्थानकावर थांबा दिला आहे. यामुळे प्रवाशी संघटनांतर्फे रेल्वे प्रशासनाचे स्वागतही करण्यात येत आहे. मात्र,या गाड्या बहुतांश वेळा या गाड्या १ ते २ तासांनी विलंबाने धावत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे विश्लेषण  रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार गाड्या धावताहेत उशिराने

सचिन देवजळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना जळगाव, पाचोरा व चाळीसगाव स्थानकावर थांबा दिला आहे. यामुळे प्रवाशी संघटनांतर्फे रेल्वे प्रशासनाचे स्वागतही करण्यात येत आहे. मात्र,या गाड्या बहुतांश वेळा या गाड्या १ ते २ तासांनी विलंबाने धावत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.दररोज कामानिमित्त, व्यवासायिनिमत्त हजारो चाकरमानी चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातुन जळगावला येत असतात. या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांना थांबा नसल्यामुळे,  येतांना महाराष्ट्र एक्सप्रेस किंवा नाशिक-भुसावळ पॅसेंजरनेच यावे लागत होते. तसेच जातांनादेखील सायंकाळी याच गाड्यांनी घराकडे जावे लागायचे. त्यामुळे सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना चाळीसगाव व पाचोरा स्थानकावर थांबा मिळण्याची अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी सुुरु होती.अखेर गेल्या आठवड्यांत खासदार ए. टी. पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन, प्रवाशांना दिलासा दिला आहे. या गाड्यांना चाळीसगाव व पाचोºयाला थांबत असल्यामुळे प्रवाशाांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, या गाड्या वेळेवर न धावता उशिरा धावत असल्याने, प्रवाशांना या गाड्यांचा कुठलाही फायदा झालेला नाही. त्यामुळे या गाड्यांना थांबा देऊन, उपयोग काय असा प्रश्न प्रवाशांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.  तसेच अधून-मधून अपची  महाराष्ट्र एक्सप्रेस भुसावळ- नाशिक पॅसेंजरही विलंबाने धावत असल्याने, प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे उत्तर प्रदेशात थंडीमुळे तर कधी तांत्रीक कामामुळे गाड्या विलंबाने धावत असल्याचे उत्तर देण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार हिवाळ््यापुरताच नसुन उन्हाळ््यातदेखील या गाड्या विलंबाने धावत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यान हजारो नोकरदार वर्ग अपडाऊन करत असुन, विलंबाने धावत असलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना घरी जाण्यासाठी २ ते ३ तासांचा कालावधी लागत आहे.  यामुळे महिला वर्गांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तर स्वतंत्र गाडी सुरु करण्याची मागणी मनमाड ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमानी अफडाऊन करत असून, बहुतांश वेळा गाडी विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. चाकर मान्यांमुळे रेल्वे प्रशासनालाही चांगले उत्पन्न मिळत असल्याने, रेल्वेने चाकर मान्यासांठी भुसावळ ते जळगाव दरम्यान स्वतंत्र गाडी सुरु करण्याची मागणी प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे.