शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेठानीला कॉल करून दिरानीने केली रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलबाई चौधरी या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्‍वर कॉलनी येथे वास्तव्यास ...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलबाई चौधरी या पती काशिनाथ ओंकार चौधरी आणि मुलगा सचिन चौधरी यांच्यासोबत रामेश्‍वर कॉलनी येथे वास्तव्यास होत्या. बाजार समितीत भाजीपाला खरेदी करुन त्याच ठिकाणी भाजी विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होत्या. बुधवारी सकाळी ७ वाजता विमलबाई नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीसाठी पती व मुलगा सचिन यांच्यासोबत बाजार समितीत गेल्या. दुपारी १२ वाजता पती तसेच मुलगा या दोघांपैकी कुणालाच काही एक न सांगता रिक्षाने त्या थेट असोदा रेल्वे गेटजवळ पोहचल्या. तेथून त्यांनी मोबाईलवरुन जेठानी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा चौधरी यांना कॉल केला, मी कंटाळली असून जीवाचे बरेवाईट करुन घेते असे सांगून कॉल कट केला.

पोलीस पोहचले पण...

दिरानी असोदा रेल्वे गेटजवळील रुळाजवळ आत्महत्या करायला निघाली आहे, तात्काळ त्यांना रोखा म्हणून शोभा चौधरी यांनी शनिपेठ पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांना कळविले. ससे यांनी चौधरी यांना विमलबाई यांना फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवा, आम्ही घटनास्थळी पोहचतोच असे सांगून तेही तातडीने निघाले. त्यानुसार शोभा चौधरी यांनी पुन्हा दिरानीला कॉल करुन बोलण्यात गुंतविले, पण पोलीस पोहचण्याआधीच रेल्वे आली अन‌् तिच्यासमोर झोकून त्यांनी जीवन संपविले. पोलीस घटनास्थळावर पोहचल्यावर दृश्य पाहून आपणही जीव वाचवू शकलो नसल्याचे शल्य त्यांच्या मनात बोचत होते.

पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेची माहिती मिळाल्यावर विमलबाई यांचे पती व मुलगा रुग्णालयात पोहचले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हवालदार विलास शिंदे करीत आहेत.