शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी औरंगाबादला उपमहाव्यवस्थापकांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:33 IST

कापसाचे घटते उत्पादन हातात येवूनही शासनाच्या आधारभूत किमतीला हरताळ फासून व्यापारी वर्गाकडून कमी भावात खरेदी होत नाही.

ठळक मुद्देरावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाचा पाठपुरावाशेतकरी बांधवांचे कमालीचे नुकसान

रावेर : कापसाचे घटते उत्पादन हातात येवूनही शासनाच्या आधारभूत किमतीला हरताळ फासून व्यापारी वर्गाकडून कमी भावात खरेदी होत नाही. यामुळे घाट्याचा सौदा करण्यापेक्षा रावेरला तातडीने भारतीय कापूस महापरिषदेचे (सी.सी.आय) च्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भारतीय कापूस महापरिषदेचे उपमहाव्यवस्थापक अर्जुन दवे यांची रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मागणी केली.गतवर्षीच्या कापूस पणन महामंडळाच्या कापूस खरेदी केंद्रावर सुरूवातीपासून अखेरपावेतो ग्रेडरअभावी रावेर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस पूर्णपणे खरेदी न झाल्याने शेतकरी बांधवांचे कमालीचे नुकसान झाले. किंबहुना, यंदाही भारतीय कापूस महापरिषदेचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत घोषणा होऊन दिवाळीसारखा सण लोटल्यानंतरही कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापारी वर्गाने केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीला हरताळ फासत जादा नफेखोरीसाठी कमी भावात कापूस खरेदी केली. शेतकर्‍यांच्या या आर्थिक नुकसानीचे गांभीर्य पाहता रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ संचालक राजीव पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, नीळकंठ चौधरी व सचिव गोपाळ महाजन यांच्या शिष्टमंडळाने थेट औरंगाबाद येथील भारतीय कापूस महापरिषदेचे उपमहाव्यवस्थापक अर्जुन दवे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना आर्थिक अडगळीत अडकलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सांगून तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.तत्पूर्वी खासदार रक्षा खडसे व आमदार शिरीष चौधरी यांनीही तगादा लावला असल्याची यावेळी पुष्टी मिळाली. कापूस महापरिषदेचे उपमहाव्यवस्थापक अर्जुन दवे यांनी कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याबाबत आश्वस्त केल्याची माहिती सभापती श्रीकांत महाजन यांनी दिली.

टॅग्स :cottonकापूसRaverरावेर