दीपनगर : वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची प्रदेश कार्यकारिणीची बैठक निंभोरा बुद्रुक येथे झाली. अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर उपस्थित होते. या बैठकीत महापारेषण कंपनी मर्यादीत, नाशिक झोनच्या अध्यक्षपदी विलास सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थितांमध्ये जळगाव झोन अध्यक्ष शेख शब्बीर, केंद्रीय पदाधिकारी उपाध्यक्ष मन्साराम कोळी, सचिव प्रकाश तायडे, सहसचिव नारायण झटके, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक उस्मानखान पठाण, तोसिफखान पठाण उपस्थित होते, तर दीपनगर शाखाध्यक्ष - राजगोपाल तेलंग, सुरेश टाक, संजय अडकमोल, रवींद्र सरदार, संजय रावलकर, संदीप पाटील, सुरेंद्रसिंग ठाकूर, विलास राजपूत, भैय्या महाजन, सुरेश सरोदे, राजू मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगराव आव्हाड यांनी केले. संघटनेचे सचिव प्रकाश तायडे यांनी आभार मानले.