शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

भूमी अभिलेखच्या ऑनलाइन सेवेचा बोजवारा

By admin | Updated: March 6, 2017 00:27 IST

थकबाकीपोटी वीज संयोजन खंडित : रावेरसह यावल व मुक्ताईनगर तालुक्यात गैरसोयींचा पाढा, मालमत्ताधारकांची कामे रेंगाळली

रावेर : मार्च एण्डिंग लागताच सर्वच विभागांना वसुलीचे वेध लागले असून उद्दिष्टपूर्तीसाठी धडक कारवाई केली जात आह़े रावेरसह यावल व मुक्ताईनगर तालुक्यातील तसेच जळगाव उपअधीक्षक कार्यालयासह अनेक ठिकाणच्या भूमी अभिलेख विभागाकडे असलेल्या वीज बिल थकबाकीमुळे या कार्यालयातील वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ऑनलाइन सेवेचा बोजवारा उडाला आह़ेऐन उन्हाळ्यातच तोडण्यात आलेल्या वीजपुरवठय़ाने अधिकारी-कर्मचारी घामाघूम झाले असून दुसरीकडे मालमत्ताधारकांची कामेही रेंगाळली आहेत़ विशेष म्हणजे दूरध्वनी सेवा खंडित करण्यात आल्याने संपर्कही तुटला आह़े शेतक:यांची कामे रेंगाळलीसूत्रांच्या माहितीनुसार,  आणखीन दोन ते तीन महिनेतरी  अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता नाही. परिणामी शेतीसह स्थावर मोजणीसाठीचा कमाल कामकाजाचा कालावधी तोंडावर असताना शेतकरीवर्गासह सामान्य जनतेचे हाल होत आहेत़ रावेर भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाचे वीजबिल थकल्याने दोन महिन्यांपासून वीजपुरवठा  खंडित करण्यात आल्याने ऑनलाइन प्रणालीच अंधारात बुडाली आहे. यासह यावल उपअधीक्षक कार्यालयाचीही दूरध्वनी व वीज सेवा खंडित करण्यात आली आहे. मुक्ताईनगर व जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयात असलेल्या जिल्हा नियोजन कक्षाचीही दूरध्वनी सेवा खंडित करण्यात आली आहे. परिणामत: जिल्हा भूमी अभिलेख विभागाची ऑनलाइन सेवाच पूर्णत: कोलमडली आहे. त्यामुळे ई-मोजणीचा ऑनलाइन अर्ज भरून मोजणीची ऑनलाइन तारीख प्राप्त होण्याची सेवा बंद पडली आहे. मालमत्ता मोजणीची तीन हजार रुपये पेक्षा जास्त असलेली रक्कम  ऑनलाइन भरण्यासाठी चलनाची प्रिंटआऊट काढण्याची सेवा बंद पडली आहे. मार्च एण्ड पाहता आयकर विवरण पत्र, पगार बिल, पीडीएस प्रणालीद्वारे ऑनलाइन भरण्यासाठी चलनाची प्रिंटआऊट काढण्याची सेवाही मिळेनाशी झाली आह़े  माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व राज्य सहकारमंत्री गुलाबराव पाटील  आदींनी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े  (वार्ताहर)अनुदान मिळण्याची शक्यता धूसरच़़़4राज्याचे जमाबंदी आयुक्त तथा संचालक (पुणे) यांनी बहुतांश अनुदानाच्या रकमा वितरीत केल्याने व तूर्तास तीन ते तीन महिने वीज बिल वा दूरध्वनीच्या सदराखाली कुठलेही अनुदान उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही. 4रब्बी वा बागाईत हंगामानंतर ऐन उन्हाळ्यात शेत शिवार मोकळे राहत असल्याच्या कारणाने मालमत्ता मोजणीचा धडाका उन्हाळ्यात वाढतो़ भूमी अभिलेख कार्यालयातील वीज व दूरध्वनी सेवा कट करण्यात आल्याने नागरिकांसह शेतक:यांना मात्र मोठाच मनस्ताप सोसावा लागत आह़े  वीज वितरण कंपनीची डिसेंबरअखेर 22 हजार रुपये इतकी थकबाकी आह़े वीज वितरण कंपनीने दोन महिन्यांपासून रितसर नोटीस देऊन वीज संयोजन खंडित केले आहे. परिणामत: ऑनलाइन सेवा बंद पडली असून जिल्ह्यात इतरत्र जाऊन मालमत्ताधारकांची कामे करण्याची तारांबळ उडत असल्याची माहिती रावेरचे भूमी अभिलेख उपअधीक्षक पंकज फेगडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़ेजिल्ह्यावर शेतक:यांची धावस्थावर मालमत्तेच्या मोजणीचा ऑनलाइन अर्ज भरणे वा ऑनलाइन चलनाची प्रिंटआऊट काढण्यासाठी शेतकरी बांधवासह जनसामान्यांना रावेरऐवजी जिल्ह्यात उपलब्ध असेल अशा अन्य तालुका उपअधीक्षक कार्यालयामध्ये स्थानिक कर्मचा:यांसमवेत जाऊन हेलपाटे मारावे लागत  आहेत़ कोटय़वधी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे सीमांकन व मोजणी करून स्वामीत्व प्रदान करणा:या भूमी अभिलेख विभागाच्या तिजोरीतच खडखडाट निर्माण झाल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आह़े मार्च एण्ड महिना म्हटला वसुलीसाठी सरकारी कार्यालयात साहेबांसह-कर्मचा:यांची धावपऴ़़ वर्षभरात भलेही कारवाई होवो न होवो मार्च महिन्यात उद्दिष्टपूर्तीसाठी सर्वच कार्यालये वसुलीसाठी धडपड करतात त्यामुळे वीजपुरवठा कट करण्यासह दूरध्वनी सेवा खंडित होते त्यामुळे मात्र सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप होतो़