शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हे पानाचे येथे डेंग्यूची फैलाव , बालिकेचा तापामुळे मृत्यू ; गावात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 13:03 IST

भुसावळ ः तालुक्यातील कु-हे ( पानाचे ) येथे गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. गावात चार ते ...

भुसावळ ः तालुक्यातील कु-हे ( पानाचे ) येथे गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. गावात चार ते पाच जणांना डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाली आहे. तर चौथीत शिकत असलेल्या बालिकेचा तापामुळे द मृत्यू झाल्याची घटना आज  २९ रोजी घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान , डेंगूू चा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. पंकज राणे यांनी 'लोकमत ' शी बोलताना दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गावात रोगराई फैलावली आहे. बरेच ग्रामस्थ तापाने फणफणले आहेत. येथील जिल्‍हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेली पायल योगेश बोबडे (बारी) हिला गेल्या तीन-चार दिवसापासून ताप आला होता. तिला भुसावळ येथे दवाखान्‍यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. औषधोपचारादरम्यान पायलला उलटी झाली. त्यावेळी डॉ. रेखा पाटील यांनी पायलला जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला मात्रा पायलचा मृत्यू झाला . अचानक आलेल्या तापाने नेमका आजार कळण्याच्या आत अभ्यासात हुशार असलेल्या पायल हिचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

गावामध्ये डेंग्यू तापाचे 17 सप्टेंबर रोजी चार ते पाच रुग्ण आढळले. मात्र यातील एक रुग्ण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तर एक रुग्ण प्राथमिक आरोग्य् केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नातेवाईक होता . त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर गावात डेंगू झाला असल्याचे दडपण्यात आले . मात्र त्यावेळी तरीही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी गावात सर्वे केला . तर ग्रामपंचायतीतर्फे धूर फवारणी करण्याच्या् सूचना दिल्या . त्यामुळेे धूर फवारणी करण्यात आली. मात्र तरीही  साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.

 

डेंगूचा रुग्ण असल्याचे डॉक्टरांनी केले मान्य

दरम्यान, भुसावळ येथे एका खाजगी रुग्णालयात अद्यापही डेंग्यूचा रुग्ण उपचार घेत आहे. त्यासंदर्भात डॉ. पंकज राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.