शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ट्रॅक्टरची मागणी निम्म्यावर, पावसाच्या लहरीपणाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 12:45 IST

दसरा-दिवाळीलाही माल हाती न आल्याने बळीराजा अडखळला

ठळक मुद्देवरुणराजाची वक्रदृष्टीकापूस काढणीत व्यस्तदिवाळीलाही ‘अवकाळी’चा परिणाम

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  शेती मशागत व कृषी मालाच्या वाहतुकीसाठी शेतक:यांचा जोडीदार असलेल्या ट्रॅक्टरच्या मागणीत यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे निम्म्याने घट आल्याचे चित्र आहे. दरवर्षी दिवाळी-दस:याला असणारी 500 ट्रॅक्टरची विक्री यंदा 250 ट्रॅक्टरवर आली आहे. मजुरांचा तुटवडा व बैलजोडीने नांगरटी व इतर मशागतीचे कामे करण्यास अधिक वेळ लागतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून ट्रॅक्टरने ही कामे करण्याकडे कल वाढला आहे. सोबतच कृषी मालाची वाहतूकही याद्वारे करता येते. त्यामुळे शेतक:यांकडून हंगाम हाती आला की, ट्रॅक्टरची खरेदी केली जाते. मात्र यंदा हीच खरेदी निम्मावर आली आहे. 

वरुणराजाची वक्रदृष्टीयंदा पावसाने दडी मारल्याने अनेक पिकांना फटका बसला. पावसाच्या दडीने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्यासह पीक हाती येणेही लांबले. त्यामुळे एरव्ही दस:यार्पयत माल घरात येऊन त्याची विक्री झाली की, बळीराजा ट्रॅक्टर खरेदीसाठी उत्सुक असतो. याही वर्षी ही उत्सुकता होती. मात्र पावसाने घात केला व दस:याच्या मुहूर्तावर अनेकजण ट्रॅक्टरची खरेदी करू शकले नाही. त्यामुळे दरवर्षी दस:याला होणारी 500 ट्रॅक्टरची विक्री यंदा 250वर आली. 

दिवाळीलाही ‘अवकाळी’चा परिणामपीक काढणे लांबल्याने दस:याला ट्रॅक्टर खरेदी होऊ शकली नाही म्हणून ही खरेदी दिवाळीला वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळीही दस:यासारखीच गेली. शेतात पीक उभे असताना ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने पिकांचे नुकसान झाले व मालही काढता आला नाही. त्यामुळे दिवाळीमध्येही हाती पैसा नसल्याने खरेदीही होऊ शकली नाही व दिवाळीमध्येही हा आकडा 500 वरून 250वर आला.  

कापूस काढणीत व्यस्तदिवाळीच्या पूर्वी काही दिवस हाती असले तरी या काळात शेतक:यांनी खरेदीपेक्षा माल काढण्याकडे अधिक लक्ष दिले. यामध्ये कापूस काढणीत बळीराजा व्यस्त राहिला. कापूस उत्पादक शेतकरी काढणी व्यस्त राहिला तरी  दुसरीकडे यावल, रावेर, चोपडा या केळी पट्टय़ातील शेतक:यांना ट्रॅक्टर खरेदी करता आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. शहरात काही नवीन कंपन्यांचे ट्रॅक्टर शो रुम सुरू झाल्याने त्यांनी ‘मार्केटिंग’ जोरात सुरू केले आहे. त्यांचे क्षेत्र वाढत असल्याने यंदा त्यांच्या आकडेवारीत वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र एकूण बाजारपेठेचा विचार केला तर मागणी निम्म्यावर आली आहे.

यंदा पावसाचा परिणाम होऊन दसरा व दिवाळीला माल हाती न आल्याने शेतकरी त्यांची विक्रीही करू शकले नाही. हातात पैसा नसल्याने त्यांना ट्रॅक्टर खरेदी करता आली नाही. परिणामी ट्रॅक्टरची मागणी घटली. मात्र नवीन कंपन्यांच्या शोरुममध्ये ट्रॅक्टरची विक्री वाढली. - ए.बी. पिंजारी, व्यवस्थापक, पंकज ऑटोमोबाईल्स.