शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करण्याच्या मागणीवरून धुळे मनपात सदस्यांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 13:02 IST

स्थायी समितीच्या सभेत महिला सदस्यांचा ठिय्या

ठळक मुद्देकुत्रे व वराहांच्या बंदोबस्तासाठी एजन्सी नेमणारमोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे सलग तिस:यांदा लक्ष वेधल़ेपिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 13 -  शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर असून या समस्येवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी स्थायी समितीच्या महिला सदस्यांनी गुरूवारी सभा सुरू असतांनाच सभागृहात ठिय्या मांडला़ अखेर आयुक्तांनी मोकाट गुरे, कुत्रे व वराहांच्या बंदोबस्तासाठी एजन्सी नेमणार असल्याचे जाहीर केल़ेमहापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी झाली़ या सभेला सभापती कैलास चौधरी, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रविंद्र जाधव, प्ऱ नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होत़े अवघ्या दोन मिनिटातच विषयपत्रिकेवरील तीनही विषय वाचून मंजूर करण्यात आल़े मात्र त्यानंतर सदस्य साबीर सैय्यद यांनी कमी दराने ठेकेदारांकडून निविदा भरल्या जात असल्या तरी कामांचा दर्जा तपासून घ्यायला हवा, असे स्पष्ट केल़े तर सदस्या मायादेवी परदेशी यांनी मोकाट कुत्र्यांच्या समस्येकडे सलग तिस:यांदा लक्ष वेधल़े महापालिकेने मोकाट गुरे, कुत्रे व वराहांच्या बंदोबस्तासाठी काय कार्यवाही केली? असा प्रश्न उपस्थित करीत परदेशी यांच्यासह ललिता आघाव, जैबुन्निसा पठाण, यमुनाबाई जाधव, जोत्स्ना पाटील, हजराबी शेख यांनी सभागृहातच ठिय्या मांडला़  अखेर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मोकाट कुत्र्यांना ठार मारणे कायद्याने योग्य नाही, मात्र पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आह़े त्यामुळे मोकाट गुरे, कुत्रे व वराहांच्या बंदोबस्तासाठी एजन्सी नेमली जाईल, असे स्पष्ट केल़े सभेला स्थायी समिती सदस्य संजय गुजराथी, ईस्माइल पठाण, साबीर अली सैय्यद,  दिपक शेलार, गुलाब महाजन उपस्थित होत़े