रस्त्याचे तीन-तेरा
जळगाव : अयोध्यानगरचा मुख्य रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असूनही या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असून, महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रस्त्यावर चिखल
जळगाव : न्यू जोशी कॉलनी परिसरात रस्त्यावरच पाणी साचून चिखल साचला असून, या रस्त्यावरून वापर करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील रस्त्यावर डंपरचाही वापर होत असल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्यांची डागडुजी
जळगाव : क्रीडा संकुलाच्या समोरील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांमध्ये खडीचा कच टाकून हे रस्ते भरण्यात आले आहेत. यामुळे काही अंशी वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. बसस्थानक ते कोर्ट चौकापर्यंतचा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. मात्र, त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते.