शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:59 IST

केवळ १० हजार ६५२ मतदारांची नोंदणी

ठळक मुद्देविधानसभेसाठी जिल्ह्यातील मतदारांमध्ये होणार ४० हजारांची वाढमतदार यादी १० जानेवारीला प्रसिद्ध होणार

जळगाव: शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्यात येत असून मागील निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदार संख्येच्या तुलनेत यंदा कमी मतदार नोंदणी झाली आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी दुरूस्तीचे काम सुरू असून यंदा मतदार यादीत सुमारे ४० हजार मतदारांची भर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिक्षक मतदार संघाच्या (विधानपरिषद) उमेदवारांची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपत आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याची मुदत संपली आहे. मागील निवडणुकीच्या वेळी मतदार संख्या १२ हजार ५०० च्या आसपास होती. मात्र यंदा या शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी केवळ १० हजार ६५२ इतकीच नोंदणी झाली आहे.१० जानेवारीला मतदार यादी प्रसिद्धीमनपा, विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादी दुरूस्तीची मोहीम राबविण्यात आली. ३ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रसिद्ध यादीची मतदार संख्यात जिल्ह्यात ३२ लाख ६५ हजार इतकी होती. या दुरुस्ती मोहीमेत नव्याने ७० हजार ५४२ मतदारांचे आॅनलाईन नोंदणी अर्ज आले आहेत. त्यांची छाननी करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत यापैकी २५-३० हजार अर्ज वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार संख्येत नव्याने सुमारे ४० ते ५० हजार मतदारांची भर पडणार आहे. जानेवारी २०१७ मध्ये ३२ लाख २० हजार मतदार संख्या होती. ती सप्टेंबरपर्यंत ४५ हजारांनी वाढली होती. आता सुधारीत मतदार यादी १० जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.