शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत ""निवडणुकी’ ला पराभूत करून ""बिनविरोध""चा पुन्हा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोमात असताना गेल्या पन्नास वर्षांची आपली परंपरा राखत जळगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोमात असताना गेल्या पन्नास वर्षांची आपली परंपरा राखत जळगाव तालुक्यातील मोहाडी गावाने यंदाही बिनविरोधचा नारा दिला आहे. ग्रामपंचायतच्या ११ जागांसाठी ११ अर्ज आले आणि सर्वच वैधही ठरल्याने आता केवळ औपचारीक घोषणा बाकी आहे.

मोहाडी ग्रामपंचायतीची १९५९ मध्ये स्थापना झाली. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ही ४ हजार १०२ होती. जि. प. चे माजी अध्यक्ष स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी गावात ही बिनविरोधची परंपरा सुरू केली. तेव्हापासून सलग दहा पंचवार्षीक निवडणुकांमध्ये गावात मतदानच झालेले नाही. छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर आता ४ रोजी माघारीच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट नसताना मोहाडीत मात्र ५० वर्षांपासूनचे चित्र आधीच स्पष्ट झाले असून यंदाचे हे बिनविरोधचे ५५वे वर्ष आहे. दरम्यान, मोहाडीची जबाबदारी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुन पाचवणे यांनीही मोहाडीत अकरा जागांसाठी अकराच अर्ज आले असून सर्व वैध असल्याचे सांगत सर्वांची यंदाही बिनविरोधच निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे सांगितले.

अशी होते निवड

निवडणुका लागल्या की ग्रामस्थांची सामुहिक बैठक होते आणि त्यात पुन्हा बिनविरोधचा नार दिला जातो. उमेदवार ठरविले जातात आणि निवडणुक टाळून सर्वानुमते जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार ठरून अर्ज दाखल केले जातात. वर्षानुवर्षांची ही पंरपंरा यंदाही कायम ठेवण्यात ग्रामस्थ व नेत्यांना यश आले आहे. प्रत्येकाला संधी मिळेल असे नियोजन केले जाते. नाराजीनाट्याला थारा न देता सर्वानुमते निर्णय होत असतात..

कोट

स्व. भिलाभाऊंनी सुरू केलेली बिनविरोधची परंपरा यंदाही कायम आहे. गावात कुठलेच राजकारण, मतभेद नसतात. यामुळे विकासकामांमध्ये सुटसुटीपणा आणि पारदर्शका अधिक असते. सर्व ग्रामस्थ मिळून निर्णय घेत असतात. - पवन सोनवणे, जि. प. सदस्य

कोट

गावाची परंपरा, स्व. भिलाभाऊंचा शब्द या सर्व बाबीं कायम आहेत. गावात पक्षाचा कुठलाच विषय नसून ग्रामस्थांच्या बैठकीत बिनविरोधचा निर्णय घेतला जातो. यामुळे गावाच्या विकासात अडथळा येत नाही. मने खराब होत नाहीत. - प्रभाकर सोनवणे, माजी सभापती, तथा जि. प. सदस्य.