शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हरीण आढळले मृत अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:17 IST

कजगाव ता.भडगाव : येथील कजगाव- गोंडगाव रोड लगत असलेल्या शेतात एक हरीण मृत अवस्थेत आढळले. याबाबत वन अधिकारी यांना ...

कजगाव ता.भडगाव : येथील कजगाव- गोंडगाव रोड लगत असलेल्या शेतात एक हरीण मृत अवस्थेत आढळले. याबाबत वन अधिकारी यांना खबर दिल्यावरून त्या हरणास वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तेथेच खड्डा करुन दफन केले. तर या हरणाचा मृत्यू हा पाण्याअभावी झाला असावा, अशी शंका लोकांमध्ये व्यक्त होत आहे.याबाबत वृत्त की, कजगाव -गोंडगाव रोड लगत असलेल्या वसंत वामन शिनकर यांच्या कजगाव शिवारातील शेतात १९ रोजी सकाळी दहा वाजता एक हरीण मृत अवस्थेत पडलेले दिसल्याने त्यांनी वनविभागास लगेचच कळविले. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मृत हरण ताब्यात घेत त्यास तेथेच दफन केले. याबाबत वन कर्मचाºयांना विचारणा केली असता सदर हरणाचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी कुत्र्यानी चावल्यामुळे झाला असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे हरीण अंदाजे एक वर्ष वयाचे असावे, असेही त्यांनी सांगितले.अनेक हरणाचे कळपकजगाव- गोंडगाव मार्गावर बरड व टेकड्या मोठ्या प्रमाणात आहेत. अशा या ओस शिवारात हरीणाचे अनेक कळप आहेत. या परिसरातील शेतकºयांना ते दररोज नजरेस पडतात.पाणवठे नाहीतवन विभागाने या भागात कुत्रीम पाणवठे तयार करणे गरजेचे होते मात्र या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. पाण्याअभावीच हरणाचा मृत्यु झाला अशी याभागात चर्चा आहे. आता तरी वनविभागाने या भागात कुत्रिम पाणवठे बनवावेत अशी मागणी होत आहे.