शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

नारायण राणेंबाबत निर्णय पक्षप्रमुख घेतील - चाळीसगाव भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:19 IST

जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला सवोतोपरी बळकटी देऊ

ठळक मुद्दे मालेगाव - चाळीसगाव रस्ता दुरुस्तीचा प्रश्न मार्गीकाही आठवणींना उजाळा

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 2 - नारायण राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश झालाच  सत्तेत थांबायचे की बाहेर पडायचे.  याबाबत योग्य तो निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, आणि तो शिवसेनेच्या हिताचाच असेल. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर सवोर्तोपरी बळकटी देण्याची भुमिका निश्चित केली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी  लोकमतशी बोलतांना दिली. बुधवारी पाचोरा येथे कार्यक्रमाला जाण्यापुर्वी चाळीसगाव येथे माजी तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी रात्री कार्यकत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी लोकमतशी विशेष संवाद साधला. चाळीसगाव तालुक्यात शिवसेनेची बांधणी स्व. पप्पू गुंजाळ यांनी जाणीवपुर्वक केली होती. त्यांनी तळागाळात शिवसेनेचा विचार पोहचवला. त्यामुळे येत्या काळात येथील पालकत्व स्विकारुन जिल्हा उपप्रमुख व पप्पू गुंजाळ यांचे बंधू उमेष गुंजाळ यांना शक्ति दिली जाईल. शिवसेना एक सक्षम पर्याय म्हणून काम करेल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत उमेष गुंजाळही उपस्थित होते. गुंजाळ यांच्या  संर्पक कार्यालयासही त्यांनी धावती भेट दिली. स्व. पप्पू गुंजाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन काही आठवणींना उजाळा दिला. नगरसेविका विजया पवार, बाजार समितीचे माजी सभापती रमेश चव्हाण, राहुल पाटील, नंदकिशोर बावविस्कर, सचिन फुलवारी, संतोष राजपुत, ज्ञानेश्वर ठाकरे,  दिलीप घोरपडे,  गुणवंत शेलार, सागर चौधरी आदी उपस्थित होते. 

 मालेगाव - चाळीसगाव रस्ता दुरुस्तीचा प्रश्न मार्गीएकनाथ शिंदे यांनी मालेगाव मार्गे चाळीसगाव मध्ये प्रवेश केला. या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या माजी तालुका प्रमुख महेंद्र पाटील व शहर प्रमुख श्यामलाल कुमावत यांच्याकडून माहिती जाणून घेतली. टोलनाका बंद झाल्यापासून गेल्या चार वर्षात रस्त्याची साधी डागडुजीही झाली नाही. अशी कैफीयत त्यांच्याकडे मांडण्यात आली. यावर त्यांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याविषयी तातडीने पाठपुरावा करुन रस्ता दुरुस्तीचा प्रश्न त्वरीत मार्गी लावू, असे अश्वासित केले. यावेळी शैलेंद्र सातपुते, निलेश गायके,  अनुराधा पाटील, रामेश्वर चौधरी, वसिम शेख, रघुनाथ कोळी, आरीफ मुल्ला, चंद्रकांत नागणे आदींनी त्यांचा सत्कार केला.