शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहर व तालुकाध्यक्षपदाचा निर्णय जिल्हास्तरावरुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:52 IST

चाळीसगाव : दिवसभर बैठकीचे सत्र, १७ इच्छुकांमध्ये रस्सीखेच

चाळीसगाव : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडीची प्रक्रिया रविवारी भूषण मंगल कार्यालयात झाली. मात्र तब्बल सहा तासानंतरही इच्छुकांमधून कुणाच्याही निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.या निवडी जिल्हास्तरावरुन जाहिर करण्यात येतील, असे निरीक्षक म्हणून उपस्थित असणा-या सदाशिव पाटील यांनी जाहिर केले. शहराध्यक्ष पदासाठी ११ तर तालुकाध्यक्ष पदासाठी सहा इच्छुकांमध्ये रस्सीखेच आहे.शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी दुपारी दोन वाजता निरीक्षक सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आपली पदावर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र निवड प्रक्रियेत इच्छुकांपैकी कुणाच्याही नावावर एकमत होऊ शकले नाही. निवडीवर रात्री आठ वाजेपर्यंत खल सुरु होता. अखेरीस निरीक्षक सदाशिव पाटील यांनी इच्छुकांची नावे जिल्हास्तरावर दिले जातील. असे सांगितले. यानंतर बैठक संपली. जिल्हास्तरावरुन कुणाची निवड होते. याकडे आता भाजपातील इच्छुकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष एकवटले आहे.यावेळी जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) डॉ. संजीव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, पं.स.सभापती स्मितल बोरसे, पालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत, वसंतराव चंद्रात्रे, मच्छींद्र राठोड, किसनराव जोर्वेकर, विद्यमान तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.१७ इच्छुकांमध्ये रस्सीखेचशहराध्यक्ष पदासाठी एकुण ११ इच्छुक आहेत. यात प्रमुख इच्छुक नगरसेवक व विद्यमान शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, अ‍ॅड. प्रशांत पालवे, प्रभाकर चौधरी, योगेश खंडेलवाल यांच्यासह विवेक चौधरी, राजेंद्र पगार, अमोल नानकर, सोमसिंग पाटील आदींचाही समावेश आहे.शहराच्या तुलनेत तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुक अवघे सहा आहेत. यात प्रमुख इच्छुक कपिल पाटील, प्रा. सुनील निकम, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, यांच्यासह किसनराव जोर्वेकर, धनंजय मांडोळे, रवींद्र चुडामण पाटील, संजय पाटील, रमेश सोनवणे, डॉ. महेश राठोड, राजेंद्र पाटील आदींनी दावा केला आहे.