अमळनेर : लग्नानिमित्त नाचण्याच्या कार्यक्रमात महिलांमध्ये नाचून विनयभंग करीत पाच जणांनी महिलांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पातोंडा येथे ११ रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडलीपातोंडा येथे बसस्टँड जवळ दौलत श्रीपत लाड यांची मुलगी मोनिका उर्फ नलिनी हिच्या लग्नानिमित्त नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी महिला आणि पुरुष स्वतंत्र नाचत असताना जगदीश आत्माराम पवार हा महिलांमध्ये नाचू लागला. तेथे असलेल्या महिलांनी त्याला विरोध केल्यावर त्याने एका महिलेचा हात ओढून विनयभंग केला. यावेळी महिलांनी संताप व्यक्त केल्यावर जगदीश पवार याने संजय दौलत पवार, ऋषिकेश भानुदास पवार, मुकुंदा दामोदर पवार, राहुल जयप्रकाश पवार यांना बोलावून आणले त्यांनी पीडित महिलांना आणि भांडण आवरणाऱ्या महिलांना मारहाण करून आम्ही तुमचा रोज विनयभंग करू अशी धमकी दिली. यावेळी इतर लोक पळत आल्यानंतर ते पळून गेले व जगदीश पवार पळताना पडून गेल्याने त्याला मुक्कामार लागला. महिलेच्या फिर्यादीवरून जगदीश पवार, संजय पवार, ऋषीकेश पवार , मुकुंद पवार, राहुल पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीना अद्याप अटक नाही. तपास हेड कॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.
पातोंडा येथे लग्नात नाचण्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:07 IST