ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. 23 - जि़जळगाव- रावेर रेल्वे स्थानकावरील अप काशी एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने २५ वर्षीय तरुणासह २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १.२० वाजेच्या सुमारास घडली़ दोन्ही तरुण-तरुणी प्रेमी युगुल असल्याचा लोहमार्ग पोलिसांना संशय आहे़विजय मायाराम पटेल (२५, रा़नेपानगर, जि़बऱ्हाणपूर) व प्रियंका अजान वासकले (वय २०, सिवाली, नेपानगर) असे मयतांची नावे आहेत. तरुणीला वाचवताना तरुणाचा मृत्यू लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १.२० वाजता रावेर रेल्वे स्थानकावर अप काशी एक्स्प्रेस उभी असताना तरुणी प्रियंका पाणी घेण्यासाठी खाली उतरली व त्याचवेळी एक्स्प्रेस सुरू झाली. त्यामुळे तरुणी रेल्वेत चढत असताना तिचा पायरीवरून पाय घसरला व तिला वाचवताना तरुणही रेल्वे खाली आला त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला , असे उपनिरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले. उभयंतांनी रेल्वे खाली आत्महत्या केली नाही, असे एकूण परिस्थितीवरून दिसून आल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.तरुण-तरुणी शेगाव दर्शनासाठीरेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, दोघा मयत तरुण-तरुणींकडे नेपानगर ते शेगाव दरम्यानचे रेल्वे तिकीट आढळले आहे त्यामुळे ते शेगाव येथे दर्शनासाठी जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.दरम्यान, भुसावळ लोहमार्ग पोलिसांना घटना कळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक साळुंखे, हवालदार प्रमोद जवंजाळकर, हवालदार संजीवनी तारगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्याचे काम सुरू होते.
रेल्वेखाली आल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: April 23, 2017 20:23 IST