शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केलेल्या तरुणीपाठोपाठ तरुणाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रेमविवाहानंतर संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीसोबतच तिचा प्रियकर तथा पती प्रशांत विजयसिंग पाटील (रा.पाळधी, ता.धरणगाव) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रेमविवाहानंतर संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीसोबतच तिचा प्रियकर तथा पती प्रशांत विजयसिंग पाटील (रा.पाळधी, ता.धरणगाव) याचाही शनिवारी सकाळी उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे दोघं कुटुंबीयांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेेत. प्रियकराचे वडील विजयसिंग बाबुराव पाटील, त्याचा मित्र विकास धर्मा कोळी व विक्की उर्फ विजय संतोष बोरसे (रा.पाळधी, ता.धरणगाव) या तिघांना शनिवारी अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत विजयसिंग पाटील व आरती विजय भोसले या दोघांनी प्रेमप्रकरणातून पलायन केले होते व नंतर प्रेमविवाह करून परत आल्यावर दोनच दिवसांत आरतीचा मृत्यू झाला. प्रशांत याच्या घरात ३१ डिसेंबर रोजी ही घटना घडली. प्रशांत याने या दिवशी मित्रांसोबत घरात पार्टी केली होती. त्यानंतर एका खोलीत आरती, तर प्रशांत दुसऱ्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. रुग्णालयात दाखल केल्यावर आरतीला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. आरतीच्या बाबतीत घातपात इतर प्रकार झाल्याचा संशय तिच्या आई, वडिलांनी व्यक्त करून तिच्या सासरचे व मित्रांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी आरतीचे वडील विजय हरसिंग भोसले यांच्या फिर्यादीवरून पती प्रशांत विजयसिंग पाटील, सासरे विजयसिंग बाबूराव पाटील, मित्र विकास धर्मा कोळी, विक्की उर्फ विजय संतोष कोळी व नणंद कविता सुनील पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शनिवारी सकाळी वरील तिघांना अटक झाली. त्यानंतर प्रशांतच्याही मृत्यूची बातमी धडकली.

व्हिसेरा ठेवला राखीव

आरती व प्रशांत या दोघांचा मृत्यू विषारी द्रव्यामुळे झाल्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला असून, नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी दोघांचाही व्हिसेरा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी दिली. दरम्यान, मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होत होता, मात्र तसा काहीच प्रकार नसल्याचेही शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालेले आहे. प्रशांतच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाली आहे, त्यामुळे आता आमचाही मुलगा मृत झाला असून, आरतीच्या कुटुंबीयाविरुध्द गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा प्रशांतच्या बहिणीने व इतर कुटुंबीयांनी घेतला होता. पाेलिसांनी मध्यस्थाची भूमिका बजावल्यानंतर प्रशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.