भुसावळ (जि.जळगाव) : रावेर रेल्वे स्थानकावरील अप काशी एक्स्प्रेसखाली सापडून रविवारी दुपारी एका तरुण व तरुणीचा मृत्यू झाला़ हे प्रेमीयुगुल असल्याचा लोहमार्ग पोलिसांचा अंदाज आहे़ विजय मायाराम पटेल (२५, रा़ नेपानगर, जि़ बऱ्हाणपूर) व प्रियंका अजान वासकले (२०, सिवाली, नेपानगर) अशी त्यांची नावे आहेत़ रविवारी दुपारी रावेर रेल्वे स्थानकावर अप काशी एक्स्प्रेस उभी असताना प्रियंका पाणी घेण्यासाठी खाली उतरली होती. पुन्हा गाडीत चढत असताना एक्स्प्रेस सुरू झाली त्यामुळे तिचा पाय पायरीवरून घसरला. या वेळी तिला वाचवताना तरुणही रेल्वेखाली आला त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, असे उपनिरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
भुसावळमध्ये रेल्वेखाली सापडून तरुण-तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: April 24, 2017 03:21 IST