शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

महिलेच्या मृत्यूने तोडफोड

By admin | Updated: March 29, 2017 23:59 IST

ममता हॉस्पिटलमधील प्रकार : उपचारात हलजर्गीपणाचा आरोप

जळगाव : शहरातील मास्टर कॉलनीतील  महिला उमेरा शेख  नईम (२७) यांचा प्रसूतीनंतर अतिरक्तश्रावाने मृत्यू झाल्याची   घटना बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ममता हॉस्पिटलमध्ये  घडली़ डॉक्टरांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत सायंकाळी ७़३० वाजता नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली़ नातेवाईकांनी तडजोडीपोटी तीन लाख मागितले, नकार दिल्याने तोडफोड केल्याचा आरोप ममता हॉस्पिटलचे डॉ़ शाहीद खान यांनी केला आहे़नईम शेख ईस्माईल पिंजारी यांचे बी़जे़मार्केटमध्ये बॅटरी रिपेअरींगचे दुकान आहे़ ते पत्नी उमेरा व तीन मुलाबाळांसह  बॉम्बे बेकरीनजीक मास्टर कॉलनीत राहतात़ उमेरा यांना मोनीस व उमेर ही जुडवा मुले असून ती सात वर्षाची तर अयान हा तीन वर्षाचा असे तीन मुले आहेत़ प्रसूतीच्या कळा आल्याने मंगळवारी रात्री १० वाजता उमेरा हिस डॉ़ शाहीद खान व डॉ़ रूख्साना खान या दाम्पत्याच्या अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या ममता हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते़

मुलगा झाला पण़़़आईचा मृत्यूसकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास उमेरा हिची नॉर्मल प्रसूती  होऊन मुलगा झाला़ मात्र या दरम्यान तिला रक्तश्राव सुरू झाला़ रक्तश्राव कुठून व कसा होतोय, हे समजत नसल्याने ममता हॉस्पिटल येथील डॉ़ रूख्साना यांनी नातेवाईकांना सोनोग्राफी करून आकाशवाणी चौकानजीकचे अपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले़आयएमचे पदाधिकारी घटनास्थळीममता हॉस्पीटलच्या तोडफोडीची माहिती मिळताच अवघ्या पंधरा मिनीटात आयएमएचे अध्यक्ष डॉ.विश्वेश अग्रवाल, डॉ. राजेश पाटील, डॉ. अनिल पाटील यांच्यासह आयएमएचे आजी-माजी पदाधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. ममता हॉस्पीटलवरील हल्याचे तीव्र निषेध केला़ तसेच तोडफोड करणाºयांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे आयएमएचे सचिव डॉ.राजेश पाटील यांनी सांगितले.हद्दीच्या वादामूळे तक्रारदाराची फिरवाफिरवप्रसुती नंतर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले़ याठिकाणी त्यांना रूग्णालय जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीत असल्याचे सांगण्यात आले़ तेथे पोहचल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले़ रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोहचल्यावर पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला़ अशा प्रकारे हद्दीच्या वादामुळे तब्बल एक ते दीड तासापर्यंत फिरवाफिरव करण्यात आल्याचेही उमेरा हिचे मामा जाबीर पिंजारी यांनी सांगितले़ ममता हॉस्पीटलची तोडफोडउमेराच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेह शवविच्देदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला़ यानंतर रात्री ७़३० वाजेच्या सुमारास संतप्त नातेवाईकांसह परिसरातील काही जणांनी रिक्षाने येवुन ममता हॉस्पीटची तोडफोड केली़ यात रूग्णालयाच्या प्रवेशाव्दारावर दगडफेक केल्याने हॉस्पिटलच्या काचा फुटल्या तसेच दवाखान्या समोर उभ्या डॉक्टरांच्या कारच्या (एम एच १९ बी यू ८८३५) समोरील बाजूचे काच फुटली़ रूग्णालयातील बाकांचेही नुकसान करण्यात आले़ आरसीपी प्लाटूनहस पोलिसांचा फौजफाटा तैनातघटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरिक्षक रोहीत खंडागळे, गुन्हे शोध विभागातील रामकृष्ण पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले़ याठिकाणी डॉक्टरांचा जबाब नोंदविण्यात आला़ अनुचित प्रकार घडू नये म्हणून आरसीपी प्लाटून नं़१ यांनाही पाचारण करण्यात आले होते़ रूग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोडफोड करणारे कैद झाले आहेत.  दगडफेकीत रूग्ण महिला जखमीजमावाने अंधाधुंद केलेल्या दगडफेकीत रूग्णालयातील प्रसुतीसाठी दाखल असलेली पल्लवी समाधान पाटील (२०, रा़ रामेश्वर कॉलनी) हिच्या पायाला दगड लागल्याने ती जखमी झाली़ घटनेची वार्ता वाºयासारखी पसरल्याने परिसरातील नागरिकांनी हॉस्पिटलजवळ एकच गर्दी केली होती़ पोलिसांनी जमाव पांगविला़ २८ रोजी उमेरा प्रसूतीसाठी दाखल झाली़ सकाळी १०़३० वाजता तीची प्रसूती झाली़ रक्तश्राव होत होता़ दुपारी १२़३० वाजता अपेक्समध्ये हलविले़ दुपारी २ वाजता उमेरा मयत झाली़ लागलीच नातेवाईकांना याबाबत माहिती दिली़ पती व सासरच्यांनी मान्य केले़ माहेरच्या लोकांनी प्रकरण मिटविण्यासाठी तीन लाख रूपये मागितले़ हा सर्व प्रकार सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत चालला़ यानंतर उमेराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला़ यानंतर ७़३०  वाजेच्या सुमारास मयताच्या माहेरच्या रिक्षातून आले व त्यांनी हॉस्पिटलवर दगडफेक केली़ यात रूग्णालयाच्या काचा, बाक, तसेच कारचे नुकसान झाले़   - डॉ़ शाहीद खान, ममता हॉस्पिटल़