शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्मचाऱ्याचा कर्तव्यावर असताना मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 18:36 IST

लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी रात्री घडली. पंकज गोपाळ चोपडे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याआधी ते भुसावळ येथे चक्कर येवून कोसळले होते, नंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

ठळक मुद्देनिवडणुकीचे मतदान साहित्य घेत असतानाच खाली कोसळलेशस्त्रक्रिया झाल्याचे लेखी पत्रही दिले होते, मात्र राखीव ड्युटीच्या आग्रहामुळे बेतले जीवावरजळगाव येथे खासगी रुग्णालयात निधन

न्हावी, ता.यावल, जि.जळगाव : लोकसभा निवडणुकीत कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना २३ रोजी रात्री घडली. पंकज गोपाळ चोपडे (वय ३५) असे त्यांचे नाव आहे. याआधी ते भुसावळ येथे चक्कर येवून कोसळले होते, नंतर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.न्हावी येथील जे.टी.महाजन पॉलिटेक्निक कॉलेजचे कर्मचारी पंकज गोपाळ चोपडे यांची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाच्या दिवशी २३ एप्रिलसाठी नियुक्ती करण्यात आली होती. इतर मतदान अधिकारी नंबर दोन (पीओ) अशी त्यांची नियुक्ती केली होती.मतदानाचे साहित्य घेण्यासाठी ते २२ रोजी भुसावळ येथे आलेले होते. मतदानाचे आवश्यक साहित्य त्यांनी ताब्यात घेतलेही आणि क्षणातच चक्कर येवून ते खाली कोसळले. याच वेळी भुसावळ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ भुसावळ पालिका रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात सांगण्यात आले. परंतु त्यांचे सावदा येथे डॉ.अतुल सरोदे यांच्याकडे औषधोपचार सुरू होते म्हणून रुग्णवाहिकेने त्यांना सावदा येथे नेण्यात आले. तेथून जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २३ रोजी रात्री साडेदहाला त्यांचा मृत्यू झाला.या वेळी चोपडे यांचे सहकारी असलेले जे.टी.महाजन पॉलिटेक्निक कॉलेजचे सागर इंगळे, मिलिंद भोगे व प्रकाश महाजन उपस्थित होते.दरम्यान, याआधी पंकज चोपडे यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना लेखी अर्ज दिला होता. ‘माझी तब्येत नेहमी नाजूक असते. त्यामुळे नेमणूक रद्द करावी,’ असे अर्जात नमूद केले होते. परंतु आॅर्डर आल्याने तुम्हाला राखीव ड्युटी करावीच लागेल, असे प्रशासनाने सांगितले, असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.२४ रोजी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.फिरोज तडवी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला. दुपारी चार वाजेला त्यांच्यावर न्हावी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व आई-वडील असा परिवार आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकYawalयावल