शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाळधी येथे महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातातील जखमी पुतण्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 15:01 IST

भाऊंबदकीत नात्याने काका-पुतणे असलेल्या अरविंद अशोक माळी (वय २६) व गजानन नारायण माळी (वय ३०) दोन्ही रा.पाळधी, ता.धरणगाव या दोघांची दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला गजानन माळी याचा शनिवारी सकाळी ९ वाजता खासगी दवाखान्यात मृत्यू झाला तर त्याचा काका अरविंद यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

ठळक मुद्दे काकाची मृत्यूशी झुंज काका-पुतण्याची दुचाकी समोरासमोर धडकलीकाका विवाहित,पुतण्या अविवाहित

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २१ : भाऊंबदकीत नात्याने काका-पुतणे असलेल्या अरविंद अशोक माळी (वय २६) व गजानन नारायण माळी (वय ३०) दोन्ही रा.पाळधी, ता.धरणगाव या दोघांची दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला गजानन माळी याचा शनिवारी सकाळी ९ वाजता खासगी दवाखान्यात मृत्यू झाला तर त्याचा काका अरविंद यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.

याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, अरविंद माळी व गजानन माळी हे दोन्ही काका-पुतणे १९ आॅक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजता लक्ष्मी पुजनाच्या दिवशी स्वतंत्र दुचाकीने जात असताना पाळधी येथे महामार्गावर बायपास जवळ दोघांच्या दुचाकी समोरासमोर धडकल्या. त्यात दोघांच्या डोक्याला जबर मार बसला आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील व सहकाºयांनी या दोघांना खासगी दवाखान्यात दाखल केले होते. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गजानन याची शनिवारी सकाळी नऊ वाजता प्राणज्योत मालवली.

रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोशगजानन याचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांची खासगी व सरकारी रुग्णालयात गर्दी झाली होती. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी प्रचंड आक्रोश केला. प्रताप पाटील यांनी नातेवाईकांना धीर देत  यंत्रणेला हाताशी धरुन तातडीने पंचनामा करण्यापासून तर शवविच्छेदन करण्यापर्यंत प्रक्रिया पार पाडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.दरम्यान, या अपघातातील काकाची मृत्यूशी झुंज सुरु आहे.