शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरला मृत्यूची माहिती लपविल्याने मृतांची संख्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 15:12 IST

कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्वसाधारण मृत्यूदरात जामनेर शहरात वाढ झाली असली तरी बाधितांचे मृत्यू म्हणून त्यांची गणना झालेली नाही.

ठळक मुद्देकोरोना कालावधीत ३३१ बाधित, १२ मृत्यूव्याधीग्रस्त वृध्दांच्या मृत्यूत वाढ

मोहन सारस्वतजामनेर : कोरोना संसर्गाच्या कालावधीत सर्वसाधारण मृत्यूदरात जामनेर शहरात वाढ झाली असली तरी बाधितांचे मृत्यू म्हणून त्यांची गणना झालेली नाही. एप्रिल व मे या दोन महिन्यात वृद्धापकाळाने किंवा अन्य व्याधींनी ग्रस्त असलेल्यांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात झाले कारण त्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार अथवा इतर आजार असल्याने व त्यात कोरोनाची भर पडली. असे असले तरी असे मृत्यू लपविण्यात आल्याचे बोलले जाते.एप्रिल व मे महिन्यात शहरात कोरोनाची मोठी भीती नागरिकांमध्ये होती. या कालावधीत शहरात व्याधीग्रस्त वृध्दांच्या मृत्यूत वाढ झाली. ज्यांच्या घरात कोरोना बाधित होते तेथे मयतांची संख्या दिसून आली. नातेवाईकांनी आरोग्य विभाग किंवा प्रशासनास न कळवता परस्पर मृतकांवर अंत्यसंस्कार केल्याने त्यांची नगरपालिकेकडे नोंद झाली नाही.पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मे ते आॅगस्ट या कालावधीत बाधितांची संख्या ३३१ व मयतांची १२ आहे.वास्तविकत: या कालावधीतील मृत्यूची संख्या निश्चितच जास्त आहे. बाधिताच्या कुटुंबातील मयताचे स्वॅब घेऊन नंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.मृत्यूदर नेहमीपेक्षा जास्त नाहीचएप्रिल ते जुलै या महिन्यात मृत्यू दर हा नेमीच्या मृत्यू दरापेक्षा जास्त नसून तो जवळपास नेहमीच्या मृत्यू दराइतकाच होता. वृद्धापकाने मृत्यू हे कारणसुद्धा मृत्यूच्या कारणांमध्ये असते. या काळात जे वृद्ध किंवा व्याधीग्रस्त होते त्यांना कदाचित कोरोना संसर्ग तत्काळ झाला व अन्य कारणाने किंवा वृद्धापकाळाने जरी त्यांचा मृत्यू झाला असला तरी कोरोना संसर्ग असल्यामुळे त्याच्या मृत्यूची गणना कोरोना मृत्यूमध्ये करण्यात आली असावी. भीती, सर्वत्र बंद, सर्वच प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये मृत्यूविषयीचे वृत्तांकन यामुळे समाजमनामध्ये अधिक भीती पसरली. केवळ कोरोना रुग्ण व त्यापैकी मृत्यूदर काढल्यामुळे हा आकडा जास्त आला असला तरी नेहमीच्या मृत्यूदराच्या जवळपासच तो होता.- डॉ.राजेश सोनवणे, तालुका आरोग्याधिकारी, जामनेर--------------------------------------------------------महिना बाधित मयत---------------------------------------------------------मे ३ २जून १२० ५जुलै ७६ ४आॅगस्ट १३२ १---------------------------------------------------------एकूण ३३१ १२--------------------------------------------------------

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJamnerजामनेर