शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

जळगाव : शोभा पाटील (५८, रा. बेंडाळे नगर) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अशोक पाटील यांच्या त्या पत्नी ...

जळगाव : शोभा पाटील (५८, रा. बेंडाळे नगर) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. अशोक पाटील यांच्या त्या पत्नी होत.

--

सुरेश वाणी

जळगाव : सुरेश वाणी (७५, रा. आशाबाबा नगर) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

बळीराम वाणी

जळगाव : बळीराम वाणी (८२, रा. दत्त कॉलनी, शाहू नगर) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, वहिनी, पुतणे, भाची असा परिवार आहे. योगेश वाणी यांचे ते काका होत.

--

मीनाक्षी चौधरी

जळगाव : मीनाक्षी चौधरी (८०) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. गिरीश चौधरी यांच्या त्या आई होत.

--

मधुकर पाटील

नशिराबाद : न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मधुकर पाटील (७५) यांचे रविवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सचिन पाटील यांचे ते वडील होत.

--

वसंत वाघुळदे

नशिराबाद : वसंत वाघुळदे (८१) याचे शनिवार अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अनिल वाघुळदे याचे ते वडील होत.

--

बळीराम जंगले

जळगाव : हभप बळीराम जंगले (९७, रा. जीवन विकास कॉलनी, ख्वॉजामिया रोड) यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. केशव जंगले यांचे ते वडील होत.

--

लीलाधर चौधरी

जळगाव : मु.जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक लीलाधर चौधरी (७८) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. डॉ. अमित चौधरी यांचे ते वडील होत.

--

अंजनाबाई आमोदकर

जळगाव : अंजनाबाई आमोदकर (६२) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नीलेश आमोदकर यांच्या त्या आई होत.

--

इंदूबाई सोनवणे

जळगाव : इंदूबाई सोनवणे (६७, रा. तानाजी मालुसरेनगर, असोदारोड) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. महेश सोनवणे यांच्या त्या आई होत.

--

सुनीता वाणी

जळगाव : सुनीता वाणी (७६, रा. भुसावळ) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने ब-हाणपूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन बहिणी, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. येथील वसुमती नेवे यांच्या त्या मोठ्या बहीण होत.

--

जयसिंग पाटील

जळगाव : माजी सैनिक जयसिंग पाटील (९०) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भीमसिंग पाटील यांचे ते वडील होत.

--

इंदूबाई पाटील

जळगाव : इंदूबाई पाटील (७५, रा. अजय कॉलनी, रिंगरोड) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राजेंद्र पाटील यांच्या त्या आई होत.

--

वत्सलाबाई महाजन

जळगाव : वत्सलाबाई महाजन (६५, रा. खोटेनगर) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानदेव महाजन यांच्या त्या पत्नी होत.

--

सरस्वतीबाई दीक्षित

जळगाव : श्री साईबाबा मंदिराच्या माजी अध्यक्षा सरस्वतीबाई दीक्षित (९७, रा. बळीराम पेठ) यांचे शनिवारी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात, मुलगा चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

काशिनाथ पाटील

जळगाव : काशिनाथ पाटील (६५) यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

--

सुमनबाई सोनवणे

जळगाव : सुमनबाई सोनवणे (७०, रा. नांद्रा बुद्रुक) रविवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पांडुरंग सोनवणे यांच्या त्या आई होत.

--